मनात इच्छाशक्ती असेल आणि काम करण्याची जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो. आता याचीच प्रचिती बीडमध्ये आली आहे. आजपर्यंत आपण सफरचंद हे फक्त थंड हवेच्या ठिकाणी येते असे म्हटले जाते. मात्र आता हे चुकीचे ठरवत बीडच्या एक शेतकऱ्यांने दुष्काळी भागात सफरचंदाची बाग फुलवली आहे.
येथील माजलगाव तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील एका शेतकऱ्याने दीड एकरात सफरचंदाची बाग फुलविली आहे. सध्या या झाडांना चांगली फळे देखील आली आहेत.
तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील शेतकरी सुरेश सीताराम सजगणे व बाळासाहेब सीताराम सजगणे या दोन भावात मिळून ४० एकर शेती आहे. यातील सुरेश सजगणे यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले असताना ते आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात.
त्यांचे शेती करण्याचे कष्ट हे बघण्यासाखरे असते. यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या शेतात भेट देत असतात. त्यांच्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत पूर्वी ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, कापूस अशी पिके घेतली जात. त्यानंतर शेतात माजलगाव धरणावरून पाईपलाईन करून व शेतात बोअरवेल घेत उसाची शेती केली.
महाबळेश्वरला जात असाल तर थांबा! महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी, 16 गावांचे स्थलांतर
असे असताना त्यांनी मोबाईलच्या यूट्यूबवर वेगवेगळी फळ शेती व इतर पिकांची माहिती बघितली. मे २०२० मध्ये त्यांनी सफरचंदाची बाग पाहिली. त्यामुळे त्यांना आपण सफरचंदाची फळबाग करून पाहावी असे वाटले. शेवटी त्यांनी मनाशी पक्के केले की, आपणही सफरचंदाची बाग लावायची. त्यांनी हिमाचल प्रदेश येथील हरिमन शर्मा यांच्याशी त्यांचा संपर्क केला, आणि याबाबत माहिती घेतली.
त्यांनी आपल्या शेतीची आणि हवामानाची देखील त्यांना माहिती दिली. त्यानंतर शर्मा यांनी त्यांच्या शेतात एच.आर.एम.एन. या जातीची सफरचंदाची झाडे चांगल्या प्रकारे येऊ शकतात असे सांगितले, आणि यानंतर खरी सुरुवात झाली. त्यांनी 600 रोपे मागवली. आणि लागवड केली. त्यांना अनेकांनी नावं ठेवून हिनवण्याचा प्रयत्न केला. आता मात्र लांबून त्यांची शेती बघण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत.
गणित करा आणि वापरा फुकट वीज! जाणून घ्या सविस्तर, होईल फायदा..
सफरचंदाच्या झाडांना ड्रीप करून चार-पाच दिवसांनी पाणी दिले तरी चालते. तसेच फवारणी व खताचा खर्च जास्त नाही. सफरचंदाच्या झाडाला जानेवारी महिन्यात फुले येतात. त्यानंतर एक ते दीड महिन्यांनी फळे लागायला सुरुवात होते. याला जास्तीचे कष्ट देखील घ्यावे लागत नाहीत. तसेच त्यांनी आंतरपीक घेऊन दीड वर्षात 6 लाखांचे उत्पादन घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या;
तुम्हाला 7 वा वेतन आयोग, 8 वा वेतन आयोग, आम्ही इकडे २४ तास मरतोय, आता 8 वा वेतन आयोग लागू होणार
आता रक्तही महागणार! महागाईचा भडका उडत असताना बाटलीमागे १०० रुपये दरवाढ, प्रस्ताव सादर
आम आदमीची देश जिंकण्याची तयारी सुरू, दिल्ली पंजाबनंतर आपचा मध्यप्रदेशातही विजय
Share your comments