1. यशोगाथा

अवघ्या पाच महिन्याच्या झाडापासून मिळाले सफरचंदाचे उत्पादन, दीडशे रुपये प्रति किलो मिळाला भाव

KJ Maharashtra
KJ Maharashtra
safarchand utpaadan

safarchand utpaadan

हिमाचल प्रदेश मधील शिमला ग्रामीण च्या धरोगडा तालुक्यातील ऐशा भामणोल गावातील प्रगतीशील फळ उत्पादकने अवघ्या पाच महिन्याच्या सफरचंदाच्या झाडापासून सफरचंदाचे उत्पादन घेतले आहे.

सोमवारी या फळ उत्पादकांचे पिकवलेल्या डार्क बैरोन बैरून गाला सफरचंदाला सिमला भट्टाकूफर फळ मार्केट मध्ये दीडशे रुपये किलो या भावाने हातोहात विक्री झाली. या फळ उत्पादक शेतकऱ्यांचे नाव आहे जवाहरलाल शर्मा. त्यांनी या सफरचंदाची रुपये इटली वरून 700 रुपये प्रति रोप याप्रमाणे तीनशे रोपे मागवली होती व त्यांची लागवड केली. लागवडीनंतर त्यांची व्यवस्थित मशागत करून अवघ्या पाच महिन्यात  जवळजवळ 130 किलो सफरचंदाचे उत्पादन तयार केले.

 जवाहरलाल शर्मा हे वर्ष 2002 मध्ये आयटीबीपी मधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांची जन्मभूमी बमनोल येथे फळ बागेची शेती सुरू केली. मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये त्यांनी डार्क बैरून गाला या जातीची तीनशे सफरचंदाची रोपे  बुक केली. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही बुक केलेली सफरचंदाचे रोपे आली आणि 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान त्यांनी त्यांची लागवड केली.

 सफरचंदाच्या बागेसाठी कशी केली तयारी?

 72 साल वय असलेले शर्मा यांनी लागवडीपूर्वी अगोदर जेसीबी मशिनच्या सहाय्याने शेती व्यवस्थित सपाट केली त्यानंतर शेतात खड्डे खोदून त्यामध्ये सफरचंदाच्या रोपे लावली. या रोपांसाठी पाण्याची सोय कमी असल्याने सिंचनाची व्यवस्था केली तसेच ओलावा टिकून राहावा  

त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला. जवाहरलाल शर्मा यांनी सांगितले की, फळबाग लागवड या अगोदर माती परीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच सफरचंदाची लागवड करताना अशा दिशेत  करा की प्रत्येक झाडाला पूर्णपणे सूर्यप्रकाश मिळेल. तसेच बोलताना ते पुढे म्हणाले की, आपल्या परिसरात असलेल्या वातावरणात तग धरतील अशाच व्हरायटीची निवड करणे महत्त्वाचे असते.

English Summary: success story of himachal farmer Published on: 07 July 2021, 08:47 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters