
Goat Farming News
शेतीप्रधान भारतात आजही अनेक कुटुंबं आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात स्वयंपूर्णतेचा आणि सशक्ततेचा नवा मंत्र म्हणून पुढे येत आहे.
SIP- Sheli Investment Plan.
शेळीपालन हा व्यवसाय केवळ जोडधंदा न राहता आता शाश्वत उत्पन्नाचं माध्यम बनतो आहे.
"गावातील SIP" ही संकल्पना शहरी SIP (Systematic Investment Plan) प्रमाणेच नियमित उत्पन्नासाठी विश्वासार्ह मार्ग ठरत आहे.
काय आहे? SIP- Sheli Investment Plan?
Sheli Investment Plan (SIP) ही शेळीपालनाच्या व्यवसायाची नियोजनबद्ध रचना आहे, जिच्या माध्यमातून अगदी दोन शेळ्यांपासूनही दरवर्षी हजारो रुपयांचं उत्पन्न मिळवता येतं.
या प्लॅनअंतर्गत योग्य जातींची निवड, आहार व्यवस्थापन, आरोग्य काळजी व गोठा निर्मिती, प्रजनन नियंत्रण, मार्केटिंग आणि विक्री पर्यंत संपूर्ण साखळी उभी केली जाते.
ग्रामीण गरजांशी सुसंगत SIP
-शेतीवर अवलंबून असलेली अस्थिर अर्थव्यवस्था, महिला आणि युवकांमध्ये बेरोजगारी, स्थलांतर वाढलेलं असणं, शेतीसाठी सेंद्रिय खताची गरज, या सर्व समस्यांवर SIP हा प्रभावी आणि कमी गुंतवणुकीचा उपाय ठरत आहे.
SIP चे फायदे
कमी जागेत आणि मर्यादित संसाधनांमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय.
-दरवर्षी शेळ्यांची वाढ- उत्पन्नात झपाट्याने वाढ.
-महिला सक्षम होतात- घरातूनच व्यवसाय.
-नैसर्गिक खत उपलब्ध- सेंद्रिय शेतीला हातभार.
-दूध, मांस आणि खत विक्री- त्रिकुट उत्पन्न.
-सरकारी योजना आणि प्रशिक्षण उपलब्ध.
-स्थानिक व शहरी बाजारपेठेतील विक्रीची मोठी संधी.
तीन टप्प्यांत SIP- एक यशस्वी मॉडेल
S- Sheli देशी आणि व्यापारी जाती निवडून शेळ्यांची वाढ.
I- Investment वेळ, समर्पण आणि थोडी आर्थिक गुंतवणूक.
P- Plan नियोजनबद्ध व्यवस्थापन- आरोग्य, पोषण, उत्पादन व विक्री.
दिवसेंदिवस शेळीपालन बाबत ग्रामीण यशोगाथा वाढत आहेत
माझ्या पशु व्यवस्थापन सल्लागार म्हणून अनुभवात अनेक उदाहरणं पाहिली आहेत-
जिथं दोन शेळ्यांनी सुरुवात करून आज कुटुंबं दरमहा 30-40 हजारांचे उत्पन्न मिळवत आहेत.
महिला बचत गट, शेतकरी गट, युवा मंडळं SIP च्या माध्यमातून नवे भविष्य घडवत आहेत.
शेवटचा मुद्दा- 'शेळी' म्हणजे संपत्ती
आज ग्रामीण SIP फक्त शेळीपालन नाही, तर "Systematic Income Plan" बनलं आहे. जे आत्मनिर्भरतेकडे, समृद्धीकडे आणि अभिमानाकडे नेणारं साधन आहे.
गावात SIP म्हणजे शेळी इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि तीच तुमचं भविष्य घडवते, संपत्ती उभी करते!
लेखक:
श्री. नितीन रामहरी पिसाळ (एम.एस.सी कृषी)
फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण
मो.बा- 8007313597
Share your comments