1. बातम्या

तुम्हाला 7 वा वेतन आयोग, 8 वा वेतन आयोग, आम्ही इकडे २४ तास मरतोय, आता 8 वा वेतन आयोग लागू होणार

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
8th pay commission implemented

8th pay commission implemented

रयत क्रांतीचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे काही दिवसांपूर्वीचे सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत एक भाषण चांगलेच व्हायरल झाले होते. आता असेच काहीसे घडत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती मांडताना सदाभाऊ खोत यांनी आमदार खासदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुख सोयीवर टीका केली होती. याउलट शेतकरी कसे कष्ट करतोय, हे त्यांनी सांगितलॆ होते.

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी देशभरात लागू आहेत आणि कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळत आहे. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की ते या संदर्भात निवेदन तयार करत आहेत. हे निवेदन लवकरच सरकारला सादर केले जाणार आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, या निवेदनातील शिफारशींनुसार पगार वाढवण्याची किंवा 8 वा वेतन आयोग ( 8th Pay Commission) आणण्याची मागणी केली जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या किमान वेतन मर्यादा 18 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये इन्क्रिमेंटमध्ये फिटमेंट फॅक्टरला खूप महत्त्व देण्यात आले आहे. सध्या हा घटक 2.57 पट आहे, जरी 7 व्या वेतन आयोगात तो 3.68 पट ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

तब्बल 9000 पेक्षा जास्त मृत शेतकऱ्यांच्या खात्यात आले पीएम किसानचे पैसे, चौकशी होणार

यामुळे यामध्ये असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरुन 26 हजार रुपये होईल. यामध्ये 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी असूनही, ( 7th Pay Commission) कमी पगार मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या तक्रारी दूर केल्या जाऊ शकतात. यामुळे आता या संदर्भात केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

महाबळेश्वरला जात असाल तर थांबा! महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी, 16 गावांचे स्थलांतर

असे झाल्यास 68 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 52 लाख पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळेल. मात्र, सरकारने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास संघटनेला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे आता याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता रक्तही महागणार! महागाईचा भडका उडत असताना बाटलीमागे १०० रुपये दरवाढ, प्रस्ताव सादर
आम आदमीची देश जिंकण्याची तयारी सुरू, दिल्ली पंजाबनंतर आपचा मध्यप्रदेशातही विजय
गणित करा आणि वापरा फुकट वीज! जाणून घ्या सविस्तर, होईल फायदा..

English Summary: 7th pay commission, 8th pay commission, dying here 24 hours, 8th pay commission implemented Published on: 19 July 2022, 12:04 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters