1. बातम्या

आम आदमीची देश जिंकण्याची तयारी सुरू, दिल्ली पंजाबनंतर आपचा मध्यप्रदेशातही विजय

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Aam aadmi's preparation win country continues

Aam aadmi's preparation win country continues

गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले आहे. दिल्ली नंतर त्यांनी पंजाबमध्येही सत्ता काबीज केली. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता संपूर्ण देशात परिवर्तन होणार असल्याचे म्हटले होते. असे असताना आता अजून एका राज्यात त्यांनी आपले खाते उघडले आहे. मध्यप्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी चालू आहे. तेथील काही भागात महानगरपालिका निवडणूका पार पडल्या असून पहिल्या टप्प्यातील निकाल लागला आहे.

यामध्ये आम आदमी पार्टीने आपली ताकद दाखवून दिली आहे. मध्यप्रदेशमधील ११ महानगरपालिका, ३६ नगरपालिका आणि ८६ नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. येथील जबलपूर, भोपाळ, सागर, सतना, सिंगरौली, छिंदवाडा, इंदौर, खंडवा, बुरहानपूर आणि उज्जैन या महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यामध्ये भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. यामध्ये यामध्ये आपने एका महानगरपालिकेवरविजय मिळवला आहे.

यामुळे आता कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. यामुळे आम आदमीचा मध्यप्रदेशमध्ये पहिलाच महापौर होणार आहे. या विजयाचा आवाज दिल्लीपर्यंत गेला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. येथील सिंगरौलीच्या महापौर म्हणून आपच्या राणी अग्रवाल या विजयी झाल्या आहेत. यामुळे आता याठिकाणी आम आदमी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंदापूरमध्ये 50 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान, 40 मेंढ्या अस्वस्थ

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत निवडून आलेल्या राणी अग्रवाल यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मध्य प्रदेशातील सिंगरौली महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी विजयी झालेल्या आप उमेदवार राणी अग्रवाल यांच्यासहित सर्व विजेते व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन, असे केंजरीवाल म्हणाले. विशेष म्हणजे याठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
गणित करा आणि वापरा फुकट वीज! जाणून घ्या सविस्तर, होईल फायदा..
महाबळेश्वरला जात असाल तर थांबा! महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी, 16 गावांचे स्थलांतर
तब्बल 9000 पेक्षा जास्त मृत शेतकऱ्यांच्या खात्यात आले पीएम किसानचे पैसे, चौकशी होणार

English Summary: Aam Aadmi's preparation win country continues, Delhi Punjab, AAP wins Madhya Pradesh Published on: 19 July 2022, 10:29 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters