1. यशोगाथा

कोण म्हणते सफरचंद थंड वातावरणात येते? खटाव तालुक्यातील 'या' शेतकऱ्याने माळावर फुलवली सफरचंदाची शेती, वाचा माहिती

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the symbolic image

the symbolic image

परंपरागत शेती पद्धती आता मागे पडत चालली असून तिची जागा आता आधुनिक आणि तंत्रज्ञान युक्‍त शेती पद्धतीने घेतली आहे. शेती पद्धतीतच बदल होत नसून पिके घेण्याच्या शेतकऱ्यांचा दृष्टिकोनात देखील बदल झाला असून आता व्यावसायिक आणि आधुनिक पिके जास्त प्रमाणात शेतकरी घेत आहेत.

आता बऱ्याच प्रमाणात फळबागांची लागवड देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले असून भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये फळबागांच्या बाबतीत विविधता आढळते.

जर आपण द्राक्षांचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कारण काही फळबागांना त्याच्या परिसरातील वातावरण  चांगल्या उत्पादनासाठी अनुकूल ठरते.

यामध्ये आपण सफरचंदाचा विचार केला तरी डोक्यात पटकन जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या सारख्या थंड प्रदेशांचा विचार येतो. परंतु हीच सफरचंदाची बाग  महाराष्ट्रासारख्या राज्यात यशस्वी करून दाखवली तर ती गोष्ट नवल वाटण्या सारखिच आहे.

जणू ही गोष्ट अशक्यप्राय आहे. परंतु एका शेतकऱ्याने ही अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली आहे. या लेखामध्ये आपण या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत.

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो, नवीन फळबागांचे कसे कराल नियोजन

सफरचंदाची बाग केली यशस्वी

 उन्हाळ्यामध्ये 40 अंश याच्यावर पारा असलेल्या खटाव सारख्या दुष्काळी भागात शेतीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी मानसिंगराव माळवे यांनी अपार कष्टाच्या जोरावर दुष्काळी भागात पुसेसावळी (ता.खटाव) या ठिकाणी अगदी माळरानावर सफरचंदाची बाग फुलवली असून यशस्वी देखील करून दाखवले आहे.

जर या परिसराचा विचार केला तर  हा परिसर दुष्काळी भागात येत असून या भागातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी पाण्याची कमतरता असताना देखील विविध फळबागा फुलवले आहेत.

त्यापैकीच पुसेसावळी येथील प्रगतिशील शेतकरी मानसिंगराव माळवे हे एक आहेत. माळवे यांनी पश्चिम महाराष्ट्रात सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

हिमाचल आणि जम्मू काश्मीरसारख्या थंड प्रदेशात पिकणारे सफरचंद हे फळ खटाव सारख्या दुष्काळी भागात पिकवून दाखवायची जिद्द त्यांनी बांधली होती.

नक्की वाचा:शेतकरी दादांनो : आंबा लागवडीसाठी या 'टीप्स' वापरा, होईल फायदा अन मिळेल भरघोस उत्पादन

त्यासाठी त्यांनी गुगल आणि युट्युब सारख्या साधनांचा वापर करतात सफरचंद लागवडीबाबत परिपूर्ण अभ्यास केला. काही हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांचा सल्ला घेतला.

या शेतकऱ्यांच्या संवादात दरम्यान त्यांना कळले की सफरचंदाचे लागवड डिसेंबर महिन्यातच करावी लागते व त्यामुळे या पद्धतीने नियोजन करत मागच्या वर्षी करमाळा तालुक्यातील बिटरगाव रोपवाटिकेत त्यांना एचआर 99 जातीचे सफरचंदाची रोपे मिळाली व कोणाचेही न ऐकता धाडसाने ऐन रणरणत्या उन्हाळ्यातही रोपांची लागवड केली.

सफरचंद फळबागाची व्यवस्थापन करताना त्यांनी युट्युब आणि अनुभवी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून मदत घेतली लागवडीनंतर साधारण 13 महिन्यात सफरचंदाच्या झाडाला सफरचंद लगडली असून बाग बहरली आहे.

याबाबत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी म्हटले की, मानसिंगराव माळवे यांनी मोठ्या जिद्दीने आणि धाडसाने ही किमया साधून दाखवली.

नक्की वाचा:उत्पादन देणाऱ्या द्राक्षांच्या जातींची माहिती..!

English Summary: in khatav taluka farmer cultivate apple orchred and wil be taking good production Published on: 02 July 2022, 10:42 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters