1. आरोग्य सल्ला

आता रक्तही महागणार! महागाईचा भडका उडत असताना बाटलीमागे १०० रुपये दरवाढ, प्रस्ताव सादर

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
blood expensive 100 rupees per bottle price hike.

blood expensive 100 rupees per bottle price hike.

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत आहे. यामुळे याची झळ सर्वसामान्य लोकांना बसत आहे. यामुळे सरकारविरोधात नाराजी असताना आता तर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी लागणारे रक्तही बाटलीमागे १०० रुपयांनी महागणार आहे. सध्या स्वयंपाकाच्या गॅसपासून अन्नधान्य महाग झाले आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे.

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्ताची दरवाढ करण्याचे पत्रक नुकतेच राज्य रक्त संक्रमण परिषदेला पाठविले होते. त्यानंतर राज्य परिषदेने दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. यामुळे ही दरवाढ आता निश्चित मानली जात आहे. २०१४ नंतर प्रथमच दरवाढ होत आहे. रक्त आणि रक्त घटक यांच्याच किमतीत १०० रुपयाने वाढ होणार आहे. तसेच आता जीएसटी परिषदेत देखील अनेक गोष्टी वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्लाझ्मा, प्लेट लेट्स आणि क्रायो यांच्या किमतीत वाढ होणार नाही. यामुळे आता खासगी रक्तपेढ्यांमधील एका बाटलीची किंमत १,५५० होणार आहे. तसेच राज्यात ३६३ रक्तपेढ्या, ७६ रक्तपेढ्या सरकार व महापालिकेच्या, २८७ रक्तपेढ्या धर्मादाय आणि खासगी संस्थेच्या आहेत. अनेकदा हे रक्त मिळत नसल्याने रुग्णाचे जीव देखील गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे याबाबत सरकारकडून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

आता तुम्ही पगाराव्यतिरिक्त एक रुपयाही जास्त लपवू शकणार नाही, वाचा नवीन नियम..

दरम्यान सध्या ८.३४ लाख बाटल्या संकलन होत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत १% रक्त संकलित केले पाहिजे. राज्याने गेली काही वर्षे त्याच्यापेक्षा अधिक रक्त संकलित केले आहे. मात्र आता दरवाढ केल्याने अनेकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सध्याच्या नवीन जीएसटी नियमानुसार मोठ्या प्रमाणावर औषध उपचार महागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
शेणापाठोपाठ आता सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करणार गोमूत्र, शेतकऱ्यांचा होणार फायदा...
निवडणुक हरल्यानंतर उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, राजकारणासाठी गेला जीव...
शेतपंप चोरणारांच्या मुसक्या वालचंदनगर पोलिसांनी आवळल्या, सणसरमधून चोरट्यांना अटक

English Summary: blood expensive! 100 rupees per bottle price hike, proposal submitted inflation flares up Published on: 19 July 2022, 11:12 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters