1. हवामान

महाबळेश्वरला जात असाल तर थांबा! महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी, 16 गावांचे स्थलांतर

आपण बघतो की दरवर्षी महाबळेश्वरला पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. असे असताना मात्र आता तुम्ही महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर थोडं थांबा. याचे कारण म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील १६ गावातील ४१४ कुटुंबातील १९३२ नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. काहींनी आपल्या नातेवाईकांकडे आपला मुक्काम हलवला आहे, तर काहींना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले आहे.

Heavy rains Mahabaleshwar, evacuation 16 villages

या पावसामुळे अनेक गावातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. याचा मोठ्या प्रमाणात फटका महाबळेश्वर तालुक्यातील गावांना बसला आहे. तसेच येथील पर्यटनावर देखील याचा परिणाम झाला आहे. तालुक्यातील घावरी, येरणे बुद्रुक, येरणे खुर्द , एरंडल, चतुरबेट, भेकवलीवाडी, मालुसर, चिखली, माचुतर, शिंदोळा, धावली, नावली, झांझवड, मोरणी या गावातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 15 दिवसांपासून तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.

यामुळे नद्या नाले भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थळांतरीत करण्यात येत आहे. पुरग्रस्तांचा मुक्काम शाळा आणि मंदिरात केला आहे. स्थलांतरीत लोकांची सोय करण्यात आलेल्या शिबीरास महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी भेट देवून लोकांशी संवाद साधला.

Petrol Diesel Rates : आता पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार? पहा आजचे नवीन दर

तसेच स्थलांतर करण्यात आलेल्या काही गावातील लोकांनी स्वत: शेजारच्या गावात नातेवाईकांकडे व इतरत्र सुरक्षित ठिकाणी आपला मुक्काम हलवला आहे. त्यांच्या अडचणीकडे प्रशासन लक्ष देत असल्याची देखील माहिती तहसिलदार यांनी दिली. यामुळे पुढील काही दिवस याठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. याठिकाणी परिस्थिती अचानक बदलत आहे.

महत्वाच्या बातम्या;
उद्यापासुन महागाई रडवणार, खाणं-पिणं आणि वैद्यकीय सेवाही महागणार
आता हायगय करायची नाही! एकदा आमदार,आयुष्यभर पगार, राज्यात 653 माजी आमदार मंत्र्यांना निवृत्ती वेतन
आनंदाची बातमी! 13 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर, तब्बल 603 कोटींहून रक्कम जमा

English Summary: going Mahabaleshwar! Heavy rains Mahabaleshwar, evacuation 16 villages Published on: 18 July 2022, 04:56 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters