1. बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदाभाऊ खोत यांनी घेतली भेट; 'या' महत्वाच्या विषयावर झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली आहे. शेती संबंधीत अनेक मुद्यांवर सदाभाऊ खोत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. या भेटीत अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली

PM Narendra Modi

PM Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली आहे. शेती संबंधीत अनेक मुद्यांवर सदाभाऊ खोत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. या भेटीत अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. या भेटी मध्ये सदाभाऊ खोत यांच्या समवेत माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निंबाळकर यांच्यासह आमदार जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.

शेती हा एक उद्योग म्हणून भरभराटीला कसा येईल, या दृष्टीने हे सरकार काम करत आहे. यासाठी केंद्रातील सरकार निश्चितपणाने शेतकऱ्यांना प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले, असे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

कृषी विद्यापीठ अभ्यासक्रमात बदलासाठी राज्यांना प्रोत्साहन, रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला देशभरात प्रोत्साहन, पीक पाहणीसाठी तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य, ड्रोनद्वारे किटकनाशक आणि खतांची फवारणी, प्रकल्पाद्वारे नऊ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार, गव्हाची सरकारी खरेदी 1208 लाख टन, नैसर्गिक शेती, झीरो बजेट, आणि सेंद्रिय शेतीचा हवा समावेश,

पाच नदीजोड प्रकल्पांच्या ब्लुप्रिंटला मान्यता, कृषी महाविद्यालय स्थापन करणे असे विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशातील शेतकरी कष्टकरी वर्गाला आशादायी असणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे या वेळी आभार मानण्यात आले.

English Summary: Prime Minister Narendra Modi met by Sadabhau Khot; There was a discussion on this important issue Published on: 04 February 2022, 12:25 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters