
bamboo farming farmar earns rs 6 crore
कोणाचे नशीब कधी उजळेल आणि कशाच्या माध्यमातून उजळेल हे कोणीही सांगू शकत नाही. आता उस्मानाबाद (Osmanabad) मधील राजशेखर पाटील या अवलियाच्या आयुष्यात लक फॅक्टर मोठा वरचढ ठरला आहे. राजशेखर यांचे वडील मुरलीधर पाटील हे शेतकरी (Farmer) कुटुंबातील होते. त्यांचे 70 लोकांचे कुटुंब होते आणि त्यांच्याकडे तब्बल 300 एकर शेतजमीन (Farmland) होती. राजशेखर पाटील श्रीमंत घरातील होते.
त्यांच्या वडिलांचे शिक्षण हेंद्राबाद येथे झाले होते. मात्र त्यांनी नोकरी केली नाही, त्यांनी व्यवस्थित कुटूंब चालवले. असे असताना राजशेखर यांनी बीएससी-एजीचा अभ्यास केला आणि दीर्घकाळ स्पर्धा परीक्षांची तयारी केली. तरीही सरकारी नोकरी मिळवण्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यांना शेतीची (Farming) आवड नसल्याने त्यांनी शेतीपासून देखील लांब राहण्याचा निर्णय घेतला. निराशेच्या भरात राजशेखर समाज सुधारक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याकडे काम करू लागले.
त्यांनी अण्णा हजारेंसोबत जलसंधारण, मृदसंधारण आणि व्यसनमुक्ती यांसारख्या मोहिमांमध्ये काम केले. अण्णा हजारे त्यांना सुरुवातीला महिन्याला 2000 रुपये द्यायचे आणि 6 वर्षे काम केल्यानंतर त्यांचा पगार 6000 रुपये महिना अण्णांनी केला होता. यामुळे त्यांनी सुरुवातीला अगदी कमी पैशांमध्ये काम केले. त्यानंतर मात्र कुटुंबाची वाटणी झाली, यातच अचानक राजशेखर यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. राजशेखर यांच्या आईने त्यांना फोन केला घरची सर्व परिस्थिती सांगितली.
'बैल कधी एकटा येत नाही, सोबत नांगर घेऊन येतो'
राजशेखर यांच्या आईने राजशेखर यांना घरावर 15 लाखांचे कर्ज असल्याचे सांगितले, तसेच त्यांना घरी येण्याची विनंती केली. त्यानंतर ते घरी येऊन शेती करू लागले. असे असताना शेतीला कुंपण म्हणून त्यांनी बांबू लावले, सरकारी रोपवाटिकेत बांबूची रोपे मोफत दिली जात असल्याचे त्यांना समजले. कुंपण घालायला पैसे नव्हते म्हणून त्यांनी बांबू लावले.
राजशेखर पाटील यांनी बांबूची 40 हजार रोपे आणून शेताच्या बांधावर लावली. त्यांनी याचे योग्य व्यवस्थापन केले. 2 वर्षात त्यापासून 10 लाख बांबू तयार करण्यात आले. ते राजशेखरने 20, 50 आणि 100 रुपयांना विकले होते. अशा प्रकारे त्यांची उलाढाल अवघ्या 2 वर्षात एक कोटी रुपयांवर पोहोचली. यानंतर त्यांनी आणखी बांबू आणून त्यांच्या संपूर्ण शेतात लावले. यामुळे त्यांचे हे काम वाढतच गेले.
मोठी बातमी!! भारतामध्ये लवकरच येणार लोकसंख्या नियंत्रण कायदा, मोदी सरकार घेणार मोठा निर्णय
असे असताना आता त्यांच्याकडे दरवर्षी 1 कोटी बांबू तयार आहेत. त्यांची उलाढाल 6-7 कोटी रुपये आहे. बांबूने राजशेखर पाटील यांचे नशीब बदलले आहे. यानंतर राजशेखर पाटील यांनी भारतभरातून मिळणाऱ्या सर्व उत्तमोत्तम बांबूच्या जाती आणून आपल्या शेतात लावल्या आहेत, अनेक शेतकरी त्यांच्या शेतात भेटी देण्यासाठी येत असतात.
महत्वाच्या बातम्या;
दुकानदाराने खते दिली नाहीत तर मोबाईवर चेक करा खतसाठा, खत विक्रेत्यांच्या मनमानीला लगाम
काय सांगता! चक्क 30 रुपयाला एक केळी, लाल केळी एवढी महाग का?
नितेश राणेंची मोठी घोषणा! बैलगाडा शर्यतीतील विजेत्याला देणार मर्सिडिज गाडी बक्षीस
Share your comments