बांबू शेती : कशी करावी लागवड ; योग्य निगा राखल्यास होईल भरघोस उत्पन्न

17 April 2020 06:02 PM
bamboo farm

bamboo farm

बांबू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते  ती जंगलातील वनस्पतीची प्रतिमा. ही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येणे स्वाभाविक होत कारण भारतीय वन कायदा १९२७ अंतर्गत बांबूचा समावेश झाडांमध्ये करण्यात आला होता.  त्यानंतर या कायद्यात बदल करण्यात आला. २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्वाचे घटक ठरु शकते असे अभ्यासात आढळून आले. बांबूच्या उत्पन्नापासून  शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणता येईल अशी शाश्वती झाल्यानंतर या कायद्यात बदल करण्यात आला. 

राष्ट्रपतींनी भारतीय वन कायदा १९२७ कलम २ (७) मध्ये सुधारणा करण्यासाठी २०१७ साली अध्यादेश काढला त्यानुसार बांबू हे झाड नाही तर गवतवर्गीय वनस्पती आहे, अशी मान्यता दिली. आपल्या बदलेल्या मानाप्रमाणेच शेतकऱ्यांचे जीवनमान ही उंचावण्यास बांबू कारणीभूत ठरत आहे. इतकेच काय पर्यावरणाच्या संवर्धनातही बांबूचा मोलाचा वाटा आहे.  जमिनीची धूप थांबवणे जमिनी थांबवणे जमिनीचा कस वाढवणे अशा मृदा व जलसंधारणाच्या कामातही बांबूचा उपयोग होतो. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्त्वाचे घटक आहे.  अशा या पिक प्रकाराविषयी आपण जाणून घेणार आहोत. बांबूची शेती कशी करावी, लागवड कशी करावी आदी बाबींविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत, बांबू हे पीक घेण्यासाठी सर्वप्रकारची जमीन योग्य असते. पण खडकाळ जमिनीवर हे पीक येणार नाही. बांबूच्या वाढीसाठी सामू ४.५ ते ६ असलेली जमीन योग्य असते. पण खडकाळ जमिनीसह क्षारपड, पाणथळ जमिनी लागवडीस योग्य अयोग्य असतात.बांबूच्या लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान आणि जास्त पाऊस असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची लागवड करावी.

बांबूची अभिवृद्धीसाठी दोन पद्धती असतात. पहिली पद्धत  -

१)बियाण्यांपासून अभिवृद्धी - बियांपासून बांबूची अभिवृद्धी करताना पुढील दोन पद्धतीचा अवलंब केला जातो. 

 • गादी वाफ्यावर बी पेरून - गादी वाफ्याची रुंदी एक मीटर व लांबी दहा मीटरपर्यंत सोयीनुसार ठेवू शकतो. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी.  बियाण्याची पेरणी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये करावी. रोपे तीन ते चार महिन्याची झाल्यानंतर काळजीपुर्वक म्हणजेच मुळांना इजा होऊ न देता पॉलिथिन पिशवीत लावावी.
 • पॉलिथिन पिशवीत लावून - पॉलिथिन पिशवीत समान प्रमाणात माती, वाळू, शेणखत, घ्यावे नंतर त्यात तीन ते चार बिया टोकून पाणी द्या. पिशवीत लावलेल्या रोपांची जोमदार वाढ होते असे निदर्शनास आले आहे.

२)कंदाद्वारे अभिवृद्धी - कंदाद्वारे अभिवृत्ती  करण्यासाठी निरोगी कंदाची निवड अत्यावश्यक आहे. कंदाची निवड करताना कंदावर दोन ते तीन डोळे असणे आवश्यक आहे.

हेही वाचा:अटल बांबू समुद्धी योजना : शाश्वत कमाईचा मार्ग, कमी खर्चात करा अधिक नफ्याची बांबू शेती

लागवडीची वेळ- आता काही दिवसातच मॉन्सून सुरू होणार आहे. मॉन्सूनच्या काळात जून -जुलै महिन्यात बांबूची लागवड करावी. लागवडीचे अंतर - काही पीके घेताना त्याच्या लागवडीचे गणित असते. बांबूची लागवड करताना काही अंतराचे नियम पाळावे लागतात. बांबूच्या जातीनुसार दोन रोपातील अंतर वेगवेगळे असते. साधारण अंतर ४ बाय ४ पासून ते १० बाय १० मी पर्यंत बदलू शकते. बांबूच्या पिकाचा कालावधी ३५ ते ४० वर्षापर्यंत असल्यामुळे जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. त्यामुळे बांबूची चांगली वाढ होते.

लागवड केल्यानंतर घ्यावयाची काळजी

 • नांगी भरणे - बांबूमध्ये पुढील कारणामुले मर आढळून येते
 • वाहतूक करताना होणारी इजा. 
 • जमिनीत पुरेसा ओलावा उलपब्ध नसणे.
 • रोपा भोवतीची माती निघाल्यामुळे.
 • कंदाला काढताना झालेली इजा
 •  बुरशी 
 • रोपांमध्ये मर आढळून आल्यास त्याजागी निरोगी रोपाची लागवड करावी.

खुरपणी - बांबू हे गवत वर्गीय वनस्पती असल्यामुळे शेतातील तणासोबत अन्नद्रव्य व पाणी यासाठी बांबूची स्पर्धा असते. याचे मुख्य कारण म्हणजे तण व बांबूचे मूळ हे जमिनीच्या वरच्या थरातील अन्न व पाणी घेत असते. ही स्पर्धा टाळण्यासाठी खुरपणी करणे आवश्यक आहे.

बांबूसाठी पाणी व्यवस्थापन कसे असावे - बांबूला जास्त पाण्याची गरज भासत नाही. ज्या प्रदेशात साधरणत ७५० ते ८०० मिलीमीटर पाऊस पडत असतो तेथे बांबूला पाणी देण्याची गरज नाही. रोपाचे वय १ ते २ वर्ष झाल्यानंतर उन्हाळ्यात रोपांना पाण्याची आवश्यकता असते.

बांबूची छाटणी  - बांबू  वेडेवाकडे असल्यास चांगला दर मिळत नाही म्हणून सरळ वाढणारी बांबू पाहिजे. त्यासाठी शाखा छाटणी आवश्यक असते.  काढणी - लागवडीनंतर साधारण ४ ते पाच बांबू काढणीस येतो बांबू जमिनीपासून ३० से.मी. अंतर ठेवून तोडावा. बांबूची काढणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात करणे फायदेशीर असते. बांबूपासून एकरी ८ ते १० हजार काट्या मिळू शकतात.

बांबू लागवडीचे फायदे

बांबू प्रजातीचे जीवनचक्र ४० ते १०० वर्ष असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही.  बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होतन नाही. बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी  ८ ते १० नवीन बांबू तयार होत असतात. पाणी साचलेल्या जमिनीवर, क्षारयुक्त जमिन तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड केली  जाऊ शकते.  इतर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर ३० ते ४० टक्के कमी खर्च येतो. पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे बांबू सोडून तिसऱ्यावर्षानंतर बांबू काढता येत असल्याने शाश्वत उत्पन्न मिळू शकते.

हेही वाचा:बांबू लागवडीपासून विक्रीपर्यंत, सर्वकाही एकाच छताखाली; कोल्हापुरात साकारला फोरम

बांबूचा उपयोग -

 • वणकाम विविध हस्तकलेच्या वस्तू बनविण्यासाठी वापर करता येतो.
 • कवळ्या कोंबापासून भाजी, लोणचे असे विविध खाद्य पदार्थ बनवता येतात.
 • बांबूचा पारंपारिक उपयोग शिडी, टोपली, सुपे इत्यादी बनविण्यासाठी
 • शेतीची अवजारे, धान्य साठविण्यासाठी कणग्या इत्यादी बांबूपासून बनवतात. 
 • फळपिकांना आधार देण्यासाठी बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
 • कागद निर्मिती उद्योगातही बांबूचा उपयोग होतो. पॅकेजिंग पॉलिजिंग पॉलिहाऊस उभारणी मध्येही बांबूचा उपयोग केला जातो.
 • जमिनीची धूप थांबवणे जमिनी थांबवणे जमिनीचा कस वाढवणे अशा मृद व जलसंधारणाच्या कामातही बांबूचा उपयोग केला जातो.
 • वातरोधक पट्टे  निर्माण करण्यासाठी सुद्धा बांबूचा उपयोग होतो.
 • टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये कपडे बनविण्यासाठी, हार्डवेअर बनविण्यासाठी बांबूचा उपयोग होतो.  झोपडी, दरवाजे, टेबल - खुर्ची, टीपॉय बनविण्यासाठी सुद्धा वापर करतात.

सरकारने अटल बांबू समुद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी तुम्ही महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या साईटवर जाऊन बांबू शेतीसाठी असलेल्या अनुदानाची माहिती आणि अर्ज करु शकता.  शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराने बांबू रोपे मिळवण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहीत केलेल्या नमुन्यात खालील दस्तावेजासह अर्ज करावा.

 • शेतीचा सात बारा उतारा/ गाव नमुना 
 • गाव नमुना/ आठ गाव नकाशीच प्रत
 • ग्राम पंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्याकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला.
 • बांबू लागवड करावयाच्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू रोपे लहना असतांना डुकरांपासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक कुंपणाची सोय असल्याचे बाबतचे हमी पत्र.
 • आधार कार्डची प्रत, बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत कोऱ्या धनादेशाची छायांकित प्रत.
 • अर्जदार शेतकऱ्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक राहिल त्याकरिता त्याने बँकेला दिलेल्या पत्रांची व बँकेकडून मिळालेल्या पोहोच पावतीची प्रत.
 • शेतामध्ये विहीर, शेततळे, बोअरवेल असल्याबाबतचे विहीत प्रपत्रात हमी पत्र, बांबू रोपांची निगा राखणे , संरक्षण करण्यासंदर्भात विहीत प्रपत्रात हमीपत्र
 • बंधपत्र जिओ टॅग जीआयएसद्वारे फोटो पाठविण्य़ाबाबत हमी पत्र. ज्या शेत जमिनीवर तसेत शेताच्या बांधावर बांबू लागवड करायची आहे ते क्षेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे.

 

 लेखक

श्री. महेश देवानंद गडाख

मो. ९८३४१५४८२८

श्री. सोज्वळ शालिकराम शिंदे

श्री. विठ्ठल देवानंद गडाख

bamboo farming bamboo farming more income way bamboo production bamboo handicrafts बांबू शेती बांबू हस्तकला बांबू शेती उत्पन्न मिळवण्याचा मार्ग अटल बांबू समृद्धी योजना Atal Bamboo Samrudhi Yojana
English Summary: bamboo farm way of more income

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.