1. बातम्या

मोठी बातमी!! भारतामध्ये लवकरच येणार लोकसंख्या नियंत्रण कायदा, मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

मोदी सरकार सध्या एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारताची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे यावर आता केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच कायदा (Law for Population Control) आणण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Union Minister Prahlad Singh Patel) यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
modi goverment population control act

modi goverment population control act

मोदी सरकार सध्या एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारताची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे यावर आता केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच कायदा (Law for Population Control) आणण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Union Minister Prahlad Singh Patel) यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. यामुळे लवकरात लवकर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

याबाबत लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. एका अहवालात लोकसंख्या अभ्यासाच्या चिनी तज्ज्ञांच्या मते, संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार भारत 2027 पर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना याबाबत मागणी केली होती. यामुळे आता चर्चा सुरु झाली आहे.

तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे समान नागरी कायदा लागू करण्याची मागणीही केली होती. दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता. 'हम दो हमारे दो' शी सहमत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे येणाऱ्या काळात मोदी याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात.

शेतकऱ्यांनो मिश्र मत्स्यव्यवसायामुळे उत्पन्नाचे दरवाजे उघडतील, होईल मोठा नफा

केंद्र सरकार लवकरच देशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणणार असल्याचे देखील केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल सांगितले आहे. यामुळे आता याबाबत निर्णय घेतला गेला तर याला विरोध होणार की अजून काही हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. २०१४ ला मोदी सरकार सत्तेत आल्यापासून याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली जात होती.

महत्वाच्या बातम्या;
'बैल कधी एकटा येत नाही, सोबत नांगर घेऊन येतो'
बजाजने सर्वात स्वस्त बाइक केली बंद, सर्वांना परवडणारी गाडी बंद झाल्याने अनेकांची नाराजी
अखेर काळजावर दगड ठेवत शेतकऱ्याने मारला उसावर रोटावेटर, ऊस तोडायला ४५ हजारांची मागणी

English Summary: Population Control Act come soon India, Modi government decision Published on: 01 June 2022, 11:38 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters