1. बातम्या

बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकार देत आहे तब्बल इतकी सबसिडी. जाणून घ्या सविस्तर

भविष्यातील शाश्वत कमाईचा उत्तम मार्ग. चीन नंतर बांबूची शेती करणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकार देत आहे तब्बल इतकी सबसिडी. जाणून घ्या सविस्तर

बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकार देत आहे तब्बल इतकी सबसिडी. जाणून घ्या सविस्तर

भविष्यातील शाश्वत कमाईचा उत्तम मार्ग.चीन नंतर बांबूची शेती करणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.शेतकरी मित्रांनो शेती क्षेत्रात नेहमीच बदल करत राहणे अनिवार्य असते, पारंपारिक पद्धतीनेच व पारंपरिक पिकांचीच लागवड करत शेती क्षेत्रात यश संपादन केले जाऊ शकत नाही. शेती क्षेत्रात चांगले यश संपादन करण्यासाठी व त्यापासून लाखो रुपयांची कमाई करण्यासाठी पारंपरिक पिकांना फाटा देत, आता मागणी मध्ये असलेल्या नगदी पिकांची लागवड करणे अनिवार्य झाले आहे. आज आपण लाखो रुपये नफा कमवून देणाऱ्या बांबू लागवड विषयी जाणून घेणार आहोत. बांबूची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते कारण की बांबूची मागणी बाजारात सदैव कायम असते

आणि बांबूला बाजारात बारामाही चांगला दर मिळत असतो. बांबूची शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे बांबू लागवडीसाठी अधिक परिश्रम घेण्याची गरज नसते तसेच यासाठी खर्च देखील अतिशय अत्यल्प असतो.बांबू शेतीचे फायदे लक्षात घेता आता देशात अनेक शेतकरी बांधवांनी बांबूची यशस्वी शेती करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असले तरी बांबूची शेती करण्याचे प्रमाण देशात अजूनही नगण्यच आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांकडे बांबूची शेती सुरू करून चांगली मोठी कमाई करण्याची संधी उपलब्ध असल्याचे जाणकार लोक मत व्यक्त करत असतात. 

मागच्या काही वर्षाच्या विचार केला तर,बळीराजा बांबू शेती करायला फारशी रुची काही दाखवत नाही, आणि म्हणूनच भारत सरकारने राष्ट्रीय बांस मिशन योजने अंतर्गत बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले.सरकार बांबू शेती साठी तब्बल ५०,००० रुपयांची सबसिडी देत आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकार बांबू शेती साठी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सबसिडी देते. तसे छोट्या शेतकऱ्यांना एक बांबूच्या झाडामागे 120 रुपये देण्याचा प्रावधान या योजनेत करण्यात आले आहे.

नॅशनल बांबू मिशनचे उद्दिष्टेे;

1) वन रहित शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात बांबूची लागवडीत वाढ घडवून आणणे.

२)कृषी उत्पन्नाला पूरक म्हणून लागवड तसेच जमिन आणि हवामान व पर्यावरण समतोल राखण्यासाठी.

३) उद्योगासाठी ग गुणवत्तापूर्ण कच्चा मालाच्या आवश्कतेच्या पूर्ती साठी बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणे.

४) मुख्यतः शेतकऱ्यांना शेतात व घराजवळ बांबूच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे.

५) सामूहिक जमीन, शेतीयोग्य कोरड जमीन, आणि नदी नाल्याजवळ बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे.

English Summary: Bamboo farming doing farmer happyness government gives subsidy Published on: 24 March 2022, 01:53 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters