सध्या राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असून आता मंत्रिमंडळ देखील लवकरच जाहीर केले जाणार आहे. असे असताना यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. आता यामध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी नेते जेवढे इच्छुक आहेत, तेचढेच आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळण्यासाठी कार्यकर्ते देखील आग्रही आहेत. यामध्ये एक नाव म्हणजे गोपीचंद पडळकर यांचे आहे. त्यांच्या नावाची चर्चा देखील मंत्रिपदासाठी आहे.
अनेकदा बड्या नेत्यांना भिडणारी भाजपमधील धडाडणारी तोफ आणि देवेंद्र फडणवीसांच्या ( Devendra Fadnavis ) अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांना अजित पवारांविरोधात मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला, तरी देखील त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. आपल्या विविध आंदोलनामुळेही ते अनेकदा चर्चेत असतात. यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप युतीच्या सरकारमध्ये त्यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे.
असे असताना आता पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी तर यासाठी एक आगळा वेगळा प्रकार केला आहे. मत्रिमंडळात आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावे, अशी मागणी आता पडळकर यांचे कार्येकर्ते करत आहेत, सांगली जिल्ह्यातील जत येथील युवा नेते अनिल पाटील आणि भाजपा विद्यार्थी आघाडी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पिरु कोळी यांनी चक्क रत्काने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामुळे याची सध्या चर्चा रंगली आहे.
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 लाख देणारच! शेतकऱ्यांसाठी 15 लाखांची घोषणा..
यामुळे आता पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी असे पत्र लिहिल्याने आता तरी पडळकरांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का? असा सवाल विचरण्यात येत आहे. सध्या धनगर मतांचं बरच राजकारणही पडळकरांवर अवलंबून आहे. सध्या ओबीसी आरक्षाचा तिढा पाहता, ओबीसींची नारीज दूर करण्यासाठी त्यांना मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. तसेच अनेक विषयांना धरून त्यांनी आंदोलने केली आहेत.
शेतकऱ्यांनो दूध डेअरी उघडण्यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये मिळणार, असा करा अर्ज
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन, एसटी कर्मचारी आंदोलन, तसेच बैलगाडा शर्यत, सतत पवारांवर चढवलेला हल्लाबोल, उसाचे आंदोलन यामुळेच ते सतत चर्चेत राहिले. यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळेल अशी, आशा त्यांच्या कार्यकर्त्याना आहे, यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
फडणवीस की फर्नांडिस? बंडखोरांचा अनोखा प्रताप, उपमुख्यमंत्र्यांच्या नावातच केला मोठा घोळ
शेतकऱ्यांनो मुख्य पिकांसोबत कडेला ही शेती करा, व्हाल लखपती
तरुणांनो संधीचे करा सोनं! रेल्वेत कोणतीही परीक्षा न देता थेट मेगाभरती...
Share your comments