1. बातम्या

फडणवीस की फर्नांडिस? बंडखोरांचा अनोखा प्रताप, उपमुख्यमंत्र्यांच्या नावातच केला मोठा घोळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. मीरा भाईंदरमध्ये भाजप समर्थकांनीही बॅनरबाजी केली होती. पण ही बॅनरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फर्नांडिस (Devendra Fernandes Poster) असा करण्यात आला होता.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
unique glory of the rebels, made a big fuss in the name of the Deputy Chief Minister

unique glory of the rebels, made a big fuss in the name of the Deputy Chief Minister

राज्याचा सत्ता संघर्ष अखेर संपुष्टात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. असे असताना राज्यभर देखील त्यांचे अभिनंदनाचे फलक लावले गेले आहेत. संपूर्ण राज्यभरात देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदनपर पोस्टर लावण्यात आले होते. अशातच मीरा भाईंदरमध्ये भाजप समर्थकांनीही बॅनरबाजी केली होती. पण ही बॅनरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे.

याचे कारण म्हणजे बॅनरमध्ये (Devendra Fadnavis News) देवेंद्र फडणवीस यांचे नाव छापतानाच मोठी चूक झाली आहे. मीरा रोडच्या शांतीनगर येथील जैन मंदिर परिसरात लावलेला बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फर्नांडिस (Devendra Fernandes Poster) असा करण्यात आला होता. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

स्वीकृत नगरसेवक विक्रम प्रतापसिंह यांनी फडणवीसांना शुभेच्छा देताना त्यांचे आडनाव फडणवीस ऐवजी फर्नांडिस केल्याने हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे जो तो याकडे बघत होता. आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतील, ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.

आता सरपंच पुन्हा जनतेतून? नवीन सरकार निर्णय घेण्याची शक्यता

दरम्यान, सोशल मीडियातही भाईंदरचा हा बॅनर आता चर्चेत आला आहे. अनेकांनी या बॅनरवरुन देवेंद्र फडणवीस आणि भाजप समर्थकांवर टीका केली आहे. प्रताप फाऊंदेशन परिवार यांच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता. विक्रम प्रतापस सिंह हे तिथले स्थानिक नगरसेवक आहेत. यामुळे आता पक्षश्रेष्ठी त्यांची कानउघडणी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
तरुणांनो संधीचे करा सोनं! रेल्वेत कोणतीही परीक्षा न देता थेट मेगाभरती...
शेतकऱ्यांनो दूध डेअरी उघडण्यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये मिळणार, असा करा अर्ज
७० एकर शेतीला लोकवर्गणीतून घातले कुंपण, शेतीच्या नुकसानाला बसणार आळा

English Summary: Fadnavis or Fernandes? unique glory of the rebels, made a big fuss in the name of the Deputy Chief Minister Published on: 07 July 2022, 11:19 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters