1. बातम्या

'जागर शेतकऱ्यांचा आकोश महाराष्ट्राचा' अभियानाला आजपासून सुरुवात

आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरून 'जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा' या राज्यव्यापी दौऱ्याला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत सुरुवात करणार आहेत. सदाभाऊ खोत यांच्याबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर असणार आहेत.

'Jagar Shetkaryancha Akosh Maharashtracha' campaign starts from today

'Jagar Shetkaryancha Akosh Maharashtracha' campaign starts from today

आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरून 'जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा' या राज्यव्यापी दौऱ्याला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत सुरुवात करणार आहेत. सदाभाऊ खोत यांच्याबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे या दौऱ्यामध्ये सामील असणार आहेत. सध्या राज्यातील शेतकरी, शेतमजुरांचे, तरुणांचे व्यवसायिकांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रशांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले आहे असे खोत यांनी म्हटले आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुणांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. मात्र राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप करत आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. लोडशेडिंग, जादा ऊस, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, वीज बिल माफी, शैक्षणिक समस्या, रखडलेली भरती, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, पेट्रोल डिझेल, दरवाढ, अतिवृष्टी, वादळ, पूर, दुष्काळ, रासायनिक खतांची टंचाई, बोगस दर या समस्यांचा समावेश आहे.

याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, आमची लढाई आता भारतीयांशी असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन आता शेतकर्‍यांच्या कोणत्या समस्या, युवकांचे प्रश्न, व्यावसायिक समस्या याबाबत माहिती घेणार आहोत असे सदाभाऊ खोत म्हणाले.

आज सकाळी १० वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर हे ११ वाजता मालवणच्या पारंपरिक मच्छीमारांशी चर्चा करणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याबाबत पर्यटन व महासंघ विषयी  चर्चा करणार आहे. दुपारी १ वाजता मालवण येथील निलकांती अतिथीगृह येथे ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर ते ३ वाजता भाजपच्या किसान मोर्चाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पाच वाजता यानी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेट देणार आहे. खारेपाटण (ता. कणकवली) येथे सायंकाळी ७ वाजता यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर हे चिंचोली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

महत्वाच्या बातम्या
Aadhar Card : तुम्ही बघितलं का निळ्या कलरचे नवीन आधार कार्ड? जाणून घ्या कोणाला मिळतं हे आधार कार्ड

बुरशीजन्य रोगांचा कर्दनकाळ आहे बोर्डो मिश्रण; जाणून घेऊ विविध फळपिके आणि भाजीपाला पिकामधील वापर

 

English Summary: 'Jagar Shetkaryancha Akosh Maharashtracha' campaign starts from today Published on: 29 April 2022, 01:32 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters