सध्याच्या जीवन शैलीमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. महत्वाचे म्हणजे हृदयात रक्ताचा प्रवाह मंदावला किंवा अवरोधित झाल्यास हृदयविकाराचा झटका (A heart attack) येतो.
रक्तवाहिन्यांमधील फॅट, कोलेस्टेरॉल किंवा इतर कशामुळेही हा ब्लॉकेज होऊ शकतो. बहुतेक लोकांच्या खराब जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका मोठ्या प्रमाणात येतो.
स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या 70% प्रकरणे सावधगिरीने टाळता येतात. विशेष म्हणजे अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, काही रक्तगटामध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
महत्वाची बातमी! शेतजमीन विकल्यास शेतकऱ्यांना भरावा लागणार 'इतका' टॅक्स; वाचा सविस्तर
O रक्तगटाला कमी धोका
अमेरिकन हार्ट असोसिएशन आर्टेरिओस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस आणि व्हॅस्क्युलर बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ए, बी आणि एबी रक्तगटांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
रक्तगट A किंवा B मध्ये O पेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 8 टक्के जास्त आहे हे .4 लाख लोकांवर केलेल्या विश्लेषणानंतर हे निष्कर्ष समोर आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
शेतकरी मित्रांनो जनावरांचे पालन 'अशा' पद्धतीने करा; अनेक आजारांपासून राहतील दूर
AB ला सर्वाधिक धोका
रक्तगट आणि हृदयविकाराच्या संबंधावर यापूर्वीही अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासातून असेही समोर आले आहे की ए, बी आणि एबी रक्तगटांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
यामध्येही एबी रक्तगट जास्त जोखमीचा असतो.हा डेटा 20 वर्षांच्या संशोधनाच्या परिणामांवर आधारित होता.एबी रक्तगटात 23 टक्क्यांपर्यंत जास्त धोका असल्याचे समोर आले.B मध्ये असलेल्यांना 11 टक्के आणि A मध्ये असलेल्यांना 5 टक्क्यांपर्यंत जास्त धोका आहे.
महत्वाच्या बातम्या
LIC च्या सरल पेन्शन योजनेत मिळणार पाहिजे तेवढी पेन्शन; फक्त 'हे' एकच काम करावे लागणार
कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळतोय? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव
'या' लोकांना मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Share your comments