1. आरोग्य सल्ला

Heart Attack: 'या' एका चाचणीने कळेल तुमच्या शरीरातील हृदयरोगाचे प्रमाण; वेळीच घेता येणार काळजी

आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. आपण पाहिले तर भारतात हृदयविकाराने ग्रस्त झालेल्यांची संख्या खूप जास्त आहे. याचे कारण म्हणजे जीवनशैली अतिशय धकाधकीची झाली आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Heart Attack test

Heart Attack test

आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. आपण पाहिले तर भारतात हृदयविकाराने ग्रस्त झालेल्यांची संख्या खूप जास्त आहे. याचे कारण म्हणजे जीवनशैली अतिशय धकाधकीची झाली आहे.

विशेष म्हणजे तेलकट पदार्थ खाण्याच्या ट्रेंडने आगीत तेल ओतले जात आहे. यामुळे रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary Artery Disease)आणि ट्रिपल वेसल डिसीज (Triple Vessel Disease) यांसारख्या हृदयविकारांचा धोका निर्माण होतो.

मात्र एक अशी चाचणी आहे, जी केल्यास तुम्हाला ह्रदयविकाराचा धोका किती आहे हे वेळीच कळू शकते आणि भविष्यात तुमच्या जीवाला असलेला धोका तुम्ही टाळू शकता. त्यामुळे हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणती चाचणी करावी? याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर त्यासाठी विशेष प्रकारची रक्त तपासणी करणे आवश्यक आहे, ज्याला ट्रोपोनिन टी चाचणी (Troponin T Test) म्हणतात.

आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ट्रोपोनिन टी टेस्ट केव्हा करावी?

तुमच्या शरीरात काही धोकादायक लक्षणे दिसायला लागल्यास, ट्रोपोनिन टी टेस्ट नक्कीच करून घ्या. ज्यामध्ये छातीत दुखणे, चक्कर येणे, घसा खवखवणे, जबडा दुखणे, अस्वस्थता, जास्त घाम येणे, उलट्या होणे आणि अति थकवा जाणवणे यांचा समावेश होतो.

LIC च्या जीवन प्रगती योजनेमध्ये दररोज 200 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीनंतर मिळवा 28 लाख रुपये

ट्रोपोनिन टी चाचणी कशी केली जाते?

ट्रोपोनिन टी टेस्ट ही रक्त तपासणीचा एक प्रकार आहे. ज्याद्वारे शरीरात सोडियम, क्रिएटिनिन आणि पोटॅशियम आढळतात. यापैकी कोणत्याही गोष्टीची पातळी वाढल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

यामध्ये हाताच्या शिरामध्ये सुई टाकून रक्ताचा नमुना घेतला जातो. या चाचणीच्या माध्यमातून जगभरातील रुग्णांना लाभ मिळतो. तुमचीही ट्रोपोनिन टी चाचणी वेळेत झाली, तर संभाव्य धोका टळू शकतो.

महत्वाच्या बातम्या 
कृषी विद्यापीठाकडून नवीन ट्रॅक्टरचलित यंत्र लॉन्च; अशाप्रकारे करा उसातील आंतरमशागत
आनंदाची बातमी! आता गॅस सिलिंडर मिळणार फक्त 750 रुपयांमध्ये; आजच करा बुकिंग
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सूक्ष्म सिंचनासाठी तब्बल 666 कोटींचे अनुदान जाहीर

English Summary: Heart Attack test know amount heart disease your body Published on: 13 September 2022, 12:48 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters