1. बाजारभाव

कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळतोय? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

शेतकरी आपल्या शेतीमध्ये चांगली पिके घेऊन चांगले उत्पादन काढत असतात. अनेक शेतकरी कांदा पिकावर भर देतात. भारतात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र कांदा पिकाचे दर शेतकऱ्यांना पाहिजे तसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
market committee

market committee

शेतकरी आपल्या शेतीमध्ये चांगली पिके घेऊन चांगले उत्पादन काढत असतात. अनेक शेतकरी कांदा पिकावर भर देतात. भारतात  कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र कांदा पिकाचे दर शेतकऱ्यांना पाहिजे तसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

सध्या कांद्याला म्हणावा तसा दर मिळत नसल्यामुळे कांदा (Onion Market Price) उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे काल सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजारभावविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

जेणेकरून शेतकरी बाजारात कांदा विक्री (Onion sale) करायला घेऊन जाताना दर पाहून घेऊन जातील. बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेवर कांदा साठवणूक केला आहे. जसा कांद्याचा भाव वाढेल तसा शेतकरी बाहेर काढतात.

'या' लोकांना मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कांद्याला (onion) चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी अजून आशा लावून बसले आहेत. सध्या मिळत असलेला कांदा बाजारभाव विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या मिळत असलेला कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारा आहे.

कांद्याला सर्वाधिक कमाल 2 हजार 200 रुपयांचा भाव मिळाला आहे. काल कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली आहे. यासाठी किमान भाव सोळाशे रुपये, कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव १८०० रुपये इतका मिळाला आहे.

LIC च्या जीवन प्रगती योजनेमध्ये दररोज 200 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीनंतर मिळवा 28 लाख रुपये

महत्वाचे म्हणजे सर्वाधिक आवक ही पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार (Onion Market Price) समिती इथेच आली असूनही आवक 27 हजार 500 क्विंटल इतकी झाली आहे.

यासाठी किमान भाव 300 कमाल भाव 1 हजार 75 आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये इतका मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्री करायला घेऊन जाताना. दराची चौकशी करून जावे.

महत्वाच्या बातम्या 
कृषी विद्यापीठाकडून नवीन ट्रॅक्टरचलित यंत्र लॉन्च; अशाप्रकारे करा उसातील आंतरमशागत
आनंदाची बातमी! आता गॅस सिलिंडर मिळणार फक्त 750 रुपयांमध्ये; आजच करा बुकिंग
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सूक्ष्म सिंचनासाठी तब्बल 666 कोटींचे अनुदान जाहीर

English Summary: market committee today's onion market price Published on: 14 September 2022, 09:45 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters