1. कृषीपीडिया

महत्वाची बातमी! शेतजमीन विकल्यास शेतकऱ्यांना भरावा लागणार 'इतका' टॅक्स; वाचा सविस्तर

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन काढतात, मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईमुळे शेती परवडत नाही. अशा वेळी शेतकरी आपली शेतजमीन विकण्याचा विचार करत असतात.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
agricultural land

agricultural land

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन काढतात, मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईमुळे शेती (agriculture) परवडत नाही. अशा वेळी शेतकरी आपली शेतजमीन विकण्याचा विचार करत असतात.

आयकर कायदा १९६१ नुसार कोणतीही शेतजमीन ही काही तरतुदींची पूर्तता केल्याशिवाय भांडवली मालमत्ता मानली जात नाही. अशा परिस्थितीत तुमची जमीन जर पूर्ण शेतजमीन असेल तर ती विकून मिळणारी रक्कम ही पूर्णपणे आयकरातील तरतुदींच्या बाहेर असेल.

टॅक्स आकारणी कधी

ज्याची लोकसंख्या १० हजारांपेक्षा कमी नाही किंवा नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या २ ते ८ किलोमीटरच्या आत येते, ज्यांची लोकसंख्या १० हजार ते १ लाख या दरम्यान असेल तर अशा शेतजमिनीची विक्री केल्यावर भांडवली नफा कर (tax) भरावा लागेल.

तसेच महापालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत कोणतीही शेतजमीन येत असेल तर अशा शेतजमिनींची विक्री केल्यावर भांडवली नफा कर भरावा लागेल.

आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कधी टॅक्स आकारला जाणार नाही

शेतजमिनीच्या विक्रीवर कधी टॅक्स (tax) आकारला जाणार नाही आणि त्यावर कधी कर आकारला जाईल, हे प्राप्तिकरातील तरतुदींमध्ये अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी या दोन्ही प्रकरणांबाहेरील जमीन विकल्यास ती कराच्या जाळ्यात येणार नाही.

शेतजमीन ही भांडवली मालमत्ता मानली तर ती विकल्यावर तुम्हाला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर भरावा लागू शकतो. तेही जेव्हा तुम्ही २४ महिन्यांपेक्षा जास्त काळ जमीन आपल्याजवळ ठेवली असेल.

LIC च्या जीवन प्रगती योजनेमध्ये दररोज 200 रुपये जमा करा आणि मॅच्युरिटीनंतर मिळवा 28 लाख रुपये

टॅक्स सवलत अशी मिळेल

कलम 54B

प्राप्तिकर कायद्याच्या या कलमांतर्गत जर तुम्ही शेतजमीन (agricultural land) विकून पैसे कमावले असतील आणि त्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स (tax) भरावा लागला असेल तर दोन वर्षांत दुसरी शेतजमीन खरेदी करून या पैशातून कर भरणे टाळता येईल.

दोन वर्षांच्या आत तुम्हाला दुसरी शेतजमीन खरेदी करता येत नसेल, तर कलम १३९ अंतर्गत आयकर विवरणपत्र भरण्यापूर्वी तुम्ही ती रक्कम भांडवली नफा खाते योजनेत जमा करू शकता. यावर तुम्हाला कर सवलतही मिळते. 

कलम 54EC

शेतजमिनीच्या विक्रीतून मिळणारा भांडवली नफा तुम्ही ६ महिन्यांच्या आत रोख्यांमध्ये गुंतवल्यास कर सवलतीचा दावाही करता येतो. अशा प्रकारे एलटीसीजीचा लाभ एका आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांत घेता येईल.

कलम 54F

महत्वाचे म्हणजे शेतजमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून घर बांधल्यास एलटीसीजी सवलतीचा दावाही करता येतो. ही रक्कम जर तुम्ही ठरलेल्या वेळेत घराच्या बांधकामात गुंतवू शकत नसाल तर तुम्ही बँकेच्या कॅपिटल गेन (Capital Gain) अकाउंट स्कीममध्ये जमा करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
कृषी विद्यापीठाकडून नवीन ट्रॅक्टरचलित यंत्र लॉन्च; अशाप्रकारे करा उसातील आंतरमशागत
आनंदाची बातमी! आता गॅस सिलिंडर मिळणार फक्त 750 रुपयांमध्ये; आजच करा बुकिंग
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सूक्ष्म सिंचनासाठी तब्बल 666 कोटींचे अनुदान जाहीर

English Summary: Important news tax paid sale agricultural land Published on: 13 September 2022, 04:27 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters