शेतकरी आपल्या शेतीमध्ये पिकांची (crops) चांगली निघा राखून चांगले उत्पादन घेत असतात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना पिकांच्या योग्य नियोजन पद्धतींची माहिती नसते. आज आपण बाजरी पिकातील सरी वरंबा पद्धतींविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
बाजरीसारख्या पोषक भरडधान्य पिकांच्या (Millet Crop) उत्पादकतेमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यांमध्ये एक प्रयोग करण्यात आला आहे.
लेसर लेव्हलिंग (Laser Leveling), सरी वरंबा पद्धती (Broad Bed Furrow Method) यातून तणनियंत्रण (weed Control) आणि जलसंवर्धनाचा प्रयोग करण्यात आला.
त्यामुळे बाजरी उत्पादनामध्ये (Millet Production) १८ टक्क्यांनी वाढ झाली. शेतकऱ्यांना हेक्टरी १३०९५ रुपये इतका अधिक फायदा मिळाला. बाजरी हे पावसाच्या पाण्यावर घेता येण्याजोगे धान्य आणि चारा असे दुहेरी कोरडवाहू पीक आहे.
शेतकरी मित्रांनो जनावरांचे पालन 'अशा' पद्धतीने करा; अनेक आजारांपासून राहतील दूर
पिकातील समस्या व उपाययोजना
१) कोरडवाहू स्थितीमध्ये बाजरी या पिकाचे उत्पादन तुलनेने कमी येते. त्यामुळे उत्पन्न आणि नफाही कमी असल्याने शेतकरी या पिकांपासून दूर होत चालले होते.
२) हे पावसाळी हंगामातील पीक असून, त्यात उतारावरील जमिनीत कमीत कमी मशागतीसह घेतले जाते. त्यात अतिरीक्त पावसामुळे जमिनीचा ऱ्हासही अधिक होऊ शकतो. हा ऱ्हास टाळण्यासाठी जमिनी समतल करणे गरजेचे असतात. त्यासाठी लेसर लेव्हलिंग तंत्राचा उपयोग होऊ शकतो.
३)अनेक पिकांमध्ये तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर वाढला आहे. मात्र, त्याच्या वापरामुळे पिकांमध्ये, मातीमध्ये तणनाशकांचे अवशेष राहू शकतात. पर्यावरणाचेही नुकसान होऊ शकते.
4) त्यामुळे मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यामध्ये फार्मर फर्स्ट प्रोग्रॅम हा बाजरी शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारण, तण व्यवस्थापनाचा प्रयोग राबवला. त्यासाठी लेसर लेव्हलिंग आणि सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करण्याचे नियोजन केले. या पद्धतीमुळे बाजरी शेतीमध्ये तणनियंत्रण आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धनही करता आले.
'या' लोकांना मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
या पद्धतीचा फायदा
1) उत्पादकता वाढवण्यासाठी लेसर आधारीत लेव्हलिग तंत्र (Laser based leveling technique) आणि त्यासोबत ट्रॅक्टरचलित सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला.
2) पहिल्या मॉन्सूनच्या पावसानंतर साधारणपणे जुलै महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यांमध्ये संकरित बाजरी जातीची पेरणी करण्यात आली. प्रति हेक्टर ४ ते ५ किलो असा बियाणे दर ठेवला.
3) दोन ओळींमध्ये ४० सेंमी अंतर ठेवल्यामुळे लागवडीनंतर २५ दिवसांनी उभ्या पिकामध्ये तणनियंत्रण करणे सोपे झाले. आंतरमशागत करता आली. किंवा २० दिवसांनी किंवा पीक १० ते ३० सेंमी उंचीचे असताना रासायनिक तणनियंत्रण करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना आरामात शक्य झाले.
4) या प्रयोगामध्ये ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठाकडून बाजरी पिकासाठी (crops) शिफारस केलेल्या पद्धतींचा अवलंब केला. पिकांच्या संवेदनशील अवस्थांमध्ये वेळीच ओलावा उपलब्ध झाल्यामुळे पिकांची चांगली वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
सावधान! 'या' रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा धोखा मोठ्या प्रमाणात असतो
LIC च्या सरल पेन्शन योजनेत मिळणार पाहिजे तेवढी पेन्शन; फक्त 'हे' एकच काम करावे लागणार
कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळतोय? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव
Share your comments