आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात (vidarbha) विजांसह पावसाची शक्यता असल्याची हवामान खात्याने वर्तविली आहे.
हवामान स्थिती
मॉन्सूनचा (mansoon) आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्रापासून ईशान्य बंगाल उपसागर पर्यंत कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते केरळ पर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे.
पश्चिम बंगाल आणि परिसरावरही (Weather Update) चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर (k s hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑगस्टच्या सुमारास बंगालच्या उपसागरात डिप्रेशन निर्माण होण्याची शक्यता आहे.
Groundnut Crop: भुईमूग पिकावरील किडीचे करा असे नियंत्रण; मिळेल भरघोस उत्पन्न
त्यानंतर ते पश्चिम -उत्तर दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावाखाली, १३, १४ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पावसाचा जोर वाढेल. अशी माहिती हवामान खात्याकडून (weather department) देण्यात आली आहे.
E Crop Inspection: 'ई पीक पाहणी' प्रक्रियेत होणार मोठा बदल; नवीन ॲप लॉन्च
या भागाला यलो अलर्ट
मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा (Weather Update) जोर ओसरला आहे. तर घाटमाथ्यावर मात्र पावसाचा दणका सुरूच आहे.
आज (ता. १३) कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या
Government Scheme: 'या' योजनेत फक्त एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट नफा
Crop Management: पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता वेळीच ओळखा; मिळेल भरघोस उत्पन्न
Pm Kisan Yojana: शेतकरी मित्रांनो 'या' गोष्टी त्वरित करा; अन्यथा पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत
Share your comments