1. हवामान

Climate Guess:अशा पद्धतीने बघा हवामानाचा अंदाज,शेती संबंधित निर्णय घेताना होईल मदत टळेल नुकसान

शेती आणि हवामान यांचा खूप निकटचा संबंध आहे. नैसर्गिक परिस्थितीवर शेतीचे गणित अवलंबून असते हे आपल्याला माहिती आहे. हवामानानुसार शेतकऱ्यांना पिकांच्या व्यवस्थापन किंवा काढणीचे नियोजन अवलंबून असते. बऱ्याचदा अचानक आलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांना पुरेशा तयारीला वेळ न मिळाल्यामुळे शेतकरी राजाचे अतोनात नुकसान होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this is simple and easy method of see meterological guess on website

this is simple and easy method of see meterological guess on website

शेती आणि हवामान यांचा खूप निकटचा संबंध आहे. नैसर्गिक परिस्थितीवर शेतीचे गणित अवलंबून असते हे आपल्याला माहिती आहे.  हवामानानुसार शेतकऱ्यांना पिकांच्या व्यवस्थापन किंवा काढणीचे नियोजन अवलंबून असते. बऱ्याचदा अचानक आलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांना पुरेशा तयारीला वेळ न मिळाल्यामुळे शेतकरी राजाचे अतोनात नुकसान होते.

आपल्याकडे  हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला जातो. स्कायमेट ही संस्था हवामानाचा अंदाज वर्तवते. परंतु अशा काही संस्थांच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला दररोज हवामान अंदाज पाहता आला तर खूप फायदेशीर ठरू शकते. अशा संस्थेच्या एखाद्या संकेतस्थळावर जाऊन हवामान अंदाज कसा पाहावा हे आपण समजून घेऊ.

नक्की वाचा:महाराष्ट्रात चार दिवस पावसाचे! या जिल्ह्यांमध्ये धो धो बरसणार, IMD कडून अलर्ट जारी

 हवामानाचा अंदाज कसा पहावा?

 यासाठी सगळ्यात आगोदर तुम्हाला हवामान खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्या ठिकाणी गेल्यानंतर….

 सगळ्यात आगोदर 'वार्निंग' हा भाग दिसेल. या विभागांमध्ये तुम्हाला हवामानाविषयी काही जास्तीचा इशारा असेल किंवा विशेष इशारा म्हटले तरी चालेल त्याची तुम्हाला तारीख आणि जिल्ह्यानुसार आणि संबंधित विभागानुसार माहिती दिलेली असते. यामध्ये आणखी 'नाऊ कास्ट' हा विभाग असतो.

नक्की वाचा:Heavy Rain: सावधान! पुढील दोन दिवस मुसळधार पाऊसाचा इशारा; शेतकऱ्यांना बसू शकतो फटका

या विभागामध्ये तुम्हाला येणाऱ्या काही तासांमध्ये हवामानासंबंधी काही इशारा आहे का, याची जिल्ह्यानुसार आणि हवामान केंद्रानुसार माहिती दिलेली असते.

त्यानंतर 'अवर सर्विस' हा एक कॉलम असतो.या कॉलम मध्ये 'रेनफॉल इन्फॉर्मेशन' या भागामध्ये मध्ये तुम्ही तुमच्या राज्यातील आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्यातील गेल्या काही तासात किती पाऊस झाला, त्याची नोंदी या ठिकाणी पाहू शकतात.

नंतर या संकेतस्थळावर 'मान्सून' हा एक भाग असतो. या भागाच्या माध्यमातून तुम्ही देशातील मान्सूनची स्थिती किंवा मानसून कुठपर्यंत पोहोचला आहे, हे पाहता येणे शक्य होते.

जर तुम्हाला चक्रीवादळ बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही या संकेतस्थळावरील 'सायक्लोन' या भागात जाऊन माहिती घेऊ शकतात. तसेच तुम्हाला स्कायमेट या संस्थेचा हवामान अंदाज हवा असेल तर या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाउन येथे पाहू शकता.

नक्की वाचा:Micro Nutrients: हवे भरघोस उत्पादन तर करा 'या' पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, मिळेल बक्कळ कमाई

English Summary: this is simple and easy method of see meterological guess on website Published on: 29 July 2022, 12:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters