1. यशोगाथा

शेतकऱ्याचा नादच खुळा..! शेतीतला नाविन्यपूर्ण प्रयोग झाला यशस्वी; आता पठ्ठ्याची ३० लाखांची कमाई

शेतकरी बंधू (Farmers) पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक पद्धतीचा देखील अवलंब करत आहेत. तसेच शेती सोबत अनेक जोडव्यवसायांना प्राधान्य देत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम (Farming) राबवताना दिसत आहेत.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
शेतकरी सुरेंद्र सिंग

शेतकरी सुरेंद्र सिंग

सध्या शेतकरी बंधू (Farmers) पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक पद्धतीचा देखील अवलंब करत आहेत. तसेच शेती सोबत अनेक जोडव्यवसायांना प्राधान्य देत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम (Farming) राबवताना दिसत आहेत. आता शेतकरीसुद्धा काळाबरोबर आपल्या शेती पद्धतीत बदल करून बक्कळ कमाई करत आहेत. असाच एक उपक्रम राजस्थानमधील (Rajsthan) एका शेतकऱ्याने केला आहे.

आपल्या शेती व शेतीपूरक व्यवसायातून असं काही यश कमावले की सगळीकडे त्यांचीच चर्चा होत आहे. या अवलियाने गाय पालन,मधमाशी पालन व एकात्मिक शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यामुळे राजस्थानमधील हा अवलिया अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे.

संपूर्ण देशात या शेतकरी बंधूची चर्चा होत आहे. राजस्थानची राजधानी जयपूरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या भैराणा गावात हा एकात्मिक शेतीचा प्रयोग तुम्हाला पहायला मिळेल. शेतकरी सुरेंद्र सिंग अवाना यांनी 80 बिघा शेतात हा एकात्मिक शेतीचा प्रयोग केला आहे.त्यांनी देशातील सर्वोत्तम गिर जातीच्या 200 गायी पाळल्या आहेत तसेच त्यांचे वृक्षारोपण, सेंद्रिय शेती, शेणखतापासून दिवे तयार करणे,

शेणखत, कुंड्या आणि विटा, सेंद्रिय खत कारखाना, मत्स्यपालन, मेंढ्या-शेळीपालन इ. व्यवसाय आहेत. गेले कित्येक वर्षे असेच नाविन्यपूर्ण प्रयोग शेतकरी सुरेंद्र यांनी आपल्या शेतात केले. शिवाय राज्यातील सर्वात मोठे प्रजनन केंद्र हे त्यांचे आहे. जिथे केवळ पायडांची पैदास केली जाते. तसेच त्यांनी शेतातच पशुखाद्य बनवण्याचा छोटा कारखाना देखील उभारला आहे.

आता निसर्गानेही सोडली शेतकऱ्यांची साथ, अतिरिक्त ऊसावर पावसाची अवकृपा

त्यांचा हा अभिनव प्रयोग पाहण्यासाठी आता दक्षिण भारतातील राज्यांमधूनही शेतकरी भेट देत आहेत. दुग्ध व्यवसायातून सुरेंद्र चांगली कमाई करत आहे. गायीचे दूध हे 80 रुपये आणि देशी तूप हे 2,000 रुपये किलो दराने विकत आहे. तसेच रसगुल्ला आणि माव्यापासून बनवलेले मिठाईसुद्धा बनवून ती विकली जात आहे. शिवाय मागणीनुसार भाजीपाला तसेच धान्यदेखील घरपोच करत आहेत.

याव्यतिरिक्त सफरचंद, स्ट्रॉबेरी, मनुका, पेरू आणि पीच या फळझाडांचीदेखील शेतकरी सुरेंद्र यांनी लागवड केली आहे. त्यांच्या शेतातून 400 कुटुंबांना दररोज फळे, भाजीपाला, धान्य, दूध आणि तूप नियमितपणे पुरवले जात आहे.तसेच धान्ये थेट बाजारात न विकता ग्राहकांच्या घरी पोहोचवला जातं आहे. यामध्ये गहू, बाजरी, मका आदींचा समावेश आहे.

खाजगी डेअरीचालकांचा मनमानी कारभार; केली दूध खरेदीदरात मोठी घट

सुरेंद्र यांनी या प्रयोगातून 30 लोकांना रोजगार देखील उपलबद्ध करून दिला आहे. शिवाय त्यांच्या शेतात जवळजवळ 22 प्रकारचा चारा तयार केला जातो. तसेच 150 प्रकारच्या औषधी वनस्पतींची देखील लागवड करण्यात आली आहे. शेतकरी सुरेंद्र सांगतात, सध्या वार्षिक 30 लाख रुपयांचा नफा मिळत आहे. शिवाय हंगामानुसार भाजीपाला तसेच धान्याचे उत्पादन घेतले जाते.

पुढे ते असे म्हणाले की, 2016 मध्ये दोन गीर गायींनी डेअरी फार्म सुरू केले, आता सध्या 200 गायी असून पुढील तीन वर्षानंतर ही संख्या आता 400 वर पोहचेल. त्यांच्या शेतात शेणखतापासून नैसर्गिक पोषक तत्त्वे मिसळून सेंद्रिय खत तयार केले जाते. शिवाय शेतीतच खत तयार करण्याचा छोटा कारखाना त्यांनी सुरु केला आहे. शेणखत व शेणापासून बनवलेल्या वस्तू ते बाजारात विकतात.

शेतीसोबत शेतकरी सुरेंद्र हे पर्यावरणाची देखील काळजी घेत आहेत. ते गेल्या दशकापासून दररोज एक झाड लावत असून शेत पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक लोकांनाही ते झाडे लावायला देतात. मागील वर्षी शेतकरी सुरेंद्र यांना राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून 'राष्ट्रीय गो पालन रत्न पुरस्कार' मिळाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळालेले ते राजस्थानमधील पहिलेचं शेतकरी आहेत. एवढंच नाही तर भारतीय कृषी संशोधन परिषदेने त्यांना 'हलधर सेंद्रिय पुरस्कारा'ने देखील पुरस्कृत केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल राज्य सरकार, कृषी विद्यापीठ जॉबनेर यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे.

महत्वाच्या बातम्या:
...असा पण एक निसर्गप्रेमी: चक्क झाड न तोडता बांधले 4 मजली घर; झाडालाच बनवलं घरामधलं फर्निचर

English Summary: Successful innovation in agriculture; Now Patha earns Rs 30 lakh Published on: 23 May 2022, 02:34 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters