1. कृषीपीडिया

अशाप्रकारे बघा शेतीकडे आपल्याला नक्कीच राजा झाल्यासारखं वाटेल

आज विशेष म्हणजे शेतकरी हा शेती कडे व्यवसाय व सकारात्मक दृष्टिकोनातुन पहातच नाही.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
अशाप्रकारे बघा शेतीकडे आपल्याला नक्कीच  राजा झाल्यासारखं वाटेल

अशाप्रकारे बघा शेतीकडे आपल्याला नक्कीच राजा झाल्यासारखं वाटेल

आज विशेष म्हणजे शेतकरी हा शेती कडे व्यवसाय व सकारात्मक दृष्टिकोनातुन पहातच नाही. आपल्याला भान असायला पाहिजे की आपन कृषी प्रधान देशाचे नागरीक आहोत.आपल्या सारख्या बहुतांशी लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे.शेतकरी हा शेतीचा विचार करूनच शेती च धोरण आखत असतो. परंतु काही नकारात्मक विचार करणारा शेतकरी वर्ग शेती मधे फायदा नाही व हा व्यवसाय फायदेशीर नाही म्हणतो

शेतकरी हा शेती वर नाराजी व्यक्त करतो अश्या विचारात तो खचतो. शेतकरीच्या मनात शेती सोडण्याचा निर्णय घ्यावा की शेती करावी या द्विधा मनस्थितीत शेतकरी अडकला असतो.हीच भुमिका शेतीच्या माध्यमातून अतिशय चिंताजनक आहे.

शेतकरी यांना शेती जर फायद्याची करायची असेल तर शेतकऱ्याने काय उपाययोजना करावेत या लेखाच्या माध्यमातून उलगडा करायचा आहे.

बांधवांनो आपल्याला प्रथम शेती करण्याची आवड निर्माण करणे महत्त्वाचे आहे आपन शेतीचे काम करत असताना आपल्याला मनात शेती पिकां बद्दल समाधानी असणें महत्वाचं आहे

 आपल्या पूर्वजांची शेती ही देणं आहे.आपन आपल्या शेतीकडे सकारात्मकतेणे बघितलं पाहीजे. आजची पिढी शेती करत असताना आपन शेती केली तर लोक काय म्हणतील ही वैचारिक भावना व्यक्त करतो तो कंटाळत, नाईलाजाने शेती करतो. मनात नकारात्मक विचार येतो कि शेती ही फायदेशीर नाही.पावसाळा वेळेवर नाही किडी रोगाने अतोनात नुकसान होते, पशुपक्षी शेतीचं नुकसान करतात अश्या विचारात गुंतला जातो.जर आपन‌ सकारात्मकतेचा विळा आपल्या हाती असला तर अडचणी बरोबर मार्ग ही सापडतो हे मनाला समजावलं कि शेती मध्ये संकटाशी सामना करण्यासाठी मनोबल प्राप्त होते. आता विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल.

कोरोणाच्या काळात मनुष्याची जिवीत हाणी झाली तर मग का मुलांना जन्माला घालणं सोडलं का?आपल्या शेती च असंच आहे

आपन जर शेती योग्य नियोजन करून जर केली तर आपल्या परीवारा योग्य अन्नधान्य व पैसा ची गरज पुर्ण होईल.आपल्याला शेती ही आवड नाही तर गरज म्हणून करावी लागेल आपल्याला मनाची व शरीराची तयारी झाली की आपली शेती फायदेशीर कश्या प्रकारे होईल या गोष्टी चां विचार आपल्यालाच करणं भाग पडले. आपन आपल्या शेतीच्या दृष्टीने पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सकारात्मकतेची सांगड घालून जर शेती केली तर हमखास शेती ही फायद्याची होईल यामध्ये शंका नाही व शेती मधल्या उनीवा जाणून घेता येईल.आपल्या शेती मध्ये पिकं कोणते प्रकारचें घ्यावें तंत्रज्ञान ची मदत घेऊन तशी शेतात उत्पादन घेता येते. 

शेतीकडे ही व्यवसायाच्या दृष्टिकोन बघणे महत्वाचे आहे.आपल्या शेतीवर होणारा खर्चात बचत व फायदा कसा होईल.या बाबत जागृत होणं गरजेचं आहे.

 काहीतर शेतकरीआपलीं शेती नुकसानीत दाखतो परीणाम काय तर स्वतःमध्ये नकारात्मक विचारच तेड निर्माण करतो. या नकारात्मक विचारातून कधीच चांगलं निर्माण होत नसतं. या साठी सकारात्मक विचारअसेल तर चांगले निर्माण होत असते. आपल्या पिकांना योग्य भाव मिळाला की तो जास्त उत्पादन करायचा प्रयत्न करतो. जो उत्पादन घेईल त्याला फायदा मिळेल जो करणार नाही त्याला फायदा मिळणार नाही.

अशा प्रकारे आपल्या मेहनती वृत्तीला प्रतिष्ठा मिळाले. प्रामाणिकतेण कष्ट केले तर की त्याचं फळ मिळतंच आणि पर्यायाने आपला विकास होतो कष्ट केल्याने आरोग्य ही चांगली राहते.त्याचप्रमाणे शेती हा एक व्यवसाय म्हणून बघितलं आणि शेतकऱ्यांनी अचूक व्यवस्थापनाच्या माध्यमातून हा व्यवसाय केला तर शेती आणि शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे.

 

Save the soil all together

मिलिंद जि गोदे

9423361185

विचार सेंद्रिय शेती चा

विचार बदला जिवन बदलेल

English Summary: See also on farming your vision after you can feel king also Published on: 07 April 2022, 05:18 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters