1. कृषीपीडिया

वातावरणात होणाऱ्या बदलानुसार पीक पद्धती मध्ये कराल बदल तरच होईल शेती फायद्याची

सध्या हवामानातील बदलसातत्याने होत असल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.त्यामुळे वातावरणातील बदलानुसार शेतीच्या पद्धतीत बदल केल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही.अजूनही बऱ्याच प्रमाणात शेतकरी वातावरणानुसार शेती पद्धतीत बदल करण्यास धाडस करीत नाहीत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
reshim kosh

reshim kosh

सध्या हवामानातील बदलसातत्याने होत असल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.त्यामुळे वातावरणातील बदलानुसार शेतीच्या पद्धतीत बदल केल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही.अजूनही बऱ्याच प्रमाणात शेतकरी वातावरणानुसार शेती पद्धतीत बदल करण्यास धाडस करीत नाहीत.

याच बदलाचा परिपाक म्हणून सध्या बरेच शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे ही मदत मिळत असून रेशीम शेती क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून संचालनालय देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे.याचाच परिणाम म्हणून अलीकडेच राज्यात पंधरा हजार 795 एकरावर तुतीची लागवड केली आहे.त्यापैकीऔरंगाबाद विभागात 8928 एकर तुती लागवड आहे. त्यामुळे राज्यातील  रेशीम उत्पादनात मराठवाड्याचे मोठे योगदान आहे. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोशास प्रति क्विंटल 68 हजार 500 रुपये असा विक्रमी दर मिळालेला आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे त्याचप्रमाणे रेशीम संचालनालयाच्या कडून देखील बाजारपेठा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नामध्ये वाढ होत आहे.तुतीची लागवड बाबत जनजागृती करण्यात आली नाही तर जे उत्पादन उत्पादित होईल त्यासाठी बाजारपेठ देखील उपलब्ध करून देण्याची भूमिका रेशीम संचालनालयाने पार पडलेली आहे. त्यामुळे बीड आणि जालना या सारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी झाला असून त्याला भावदेखील चांगला मिळत आहे.सध्या रेशीम कोषाचे दर हे 65 ते 900 रुपये किलो वर आहेत. 

त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती झाली असून महाराष्ट्राने वेगळा विक्रम देखील केला आहे.शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करावी यासाठी महारेशिम अभियान राबविण्यात आले होते. या अभियानादरम्यान लागवडीपासून काढणी आणि बाजारपेठ पर्यंतचे मार्गदर्शन संचालनालयाच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळेच तुती लागवड क्षेत्रात वाढ झाली होती. त्यामुळे अशा वातावरणातील बदलानुसार शेती पद्धतीत बदल करत गेले तर शेतकऱ्यांसमोर नवनवीन पर्याय उपलब्ध राहू शकतात. रेशीम कोशातून एक नवा पर्याय शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

English Summary: change in crop situation with atmosphere change for benificial farming Published on: 31 January 2022, 09:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters