गेल्या दोन वर्षांपासून टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत होते. आता मात्र टोमॅटोने शेतकऱ्यांना मालामाल केले आहे. यामुळे सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी दोन वर्षांनंतर समाधानी आहे. अनेक शेतकऱ्यांना आता यामुळे आनंद होत आहे. असे सडताना आता शेतकरी ऋषिकेश गंगावणे यांनी सलग तिसऱ्या वर्षी दीड एकरात टोमॅटोचा लागवडीचा प्रयोग केला होता. यावर्षी मात्र त्यांना चांगलेच उत्पन्न मिळाले आहे. यामुळे गंगावणे यांचे जीवनच बदलून गेले आहे.
यानंतर मात्र त्यांचा आनंद गगनाला मावेनासा झाला, विक्रमी उत्पन्न मिळाल्यावर शेतकरी काय करु शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी टक्क टोमॅटोच्या झाडांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. त्यांनी टोमॅटो झाडे जाळून न टाकता ती पाण्यात विसर्जित केली. आता नफा-तोट्याची तमा न बाळगता दरवर्षी टोमॅटो लागवड करण्याचा त्यांनी निर्धारच केला आहे. यामुळे सध्या त्यांची चर्चा सुरु आहे.
गंगावणे यांनी ढोल-ताशाच्या गजरात टोमॅटोच्या झाडांची मिरवणूक काढली. यामुळे सगळा गाव देखील गोळा झाला होता, या उत्पादनामुळेच आपल्या जीवनात बदल झाला आहे त्याची जाणीव ठेवण्यासाठी त्यांनी सबंध गावातून मिरवणूक तर काढलीच पण टोमॅटो झाडांचे पाण्यात विसर्जण केले. याचे फोटो आणि विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'गडकरींचे वाक्य मला आठवते की एखाद्याला आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला साखर कारखाना काढून द्या'
दरम्यान, कोरोनानंतर अवकाळी यामुळे दोन वर्षांपासून टोमॅटोमधून पैसे मिळाले नाहीत, टोमॅटो हा शेतातच जमीनदोस्त करण्यात आला. असे असले तरी गंगावणे यांनी यावर्षी दीड एकरात टोमॅटो लागवड केली. विक्रमी दरामुळे खर्च वजा जाता त्यांना 7 लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे दरवर्षी परस्थिती बदलते शेतकऱ्यांनी प्रयत्न आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास उत्पन्न हे मिळतेच असा विश्वास गंगावणे यांना आला आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील खचून जाऊ नये असा संदेशच त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या;
पेट्रोल, डिझेल होणार २० रुपयांनी स्वस्त, मोदी सरकारकडून दिलासा मिळणार
'भीक मागून कृषिमंत्र्यांना पैसे देऊ पण कांद्याला रास्तच भाव घेऊ'
मोठी बातमी! पेट्रोल डिझेलनंतर आता स्टील आणि सिमेंटचे दरही केले कमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय...
Share your comments