1. कृषीपीडिया

तुम्हीही आहात का टोमॅटो लागवडीच्या तयारीत!अहो मग जाणुन घ्या टोमॅटोच्या ह्या जातीविषयी होणार मालामाल

मित्रांनो सर्व्यात आधी जाणुन घ्या टोमॅटोचे फायदे (Benifits of Tomato) »मित्रांनो आपल्या शरीरातील हाडासाठी व्हिटॅमिन के ची आवश्यकता असते. म्हणुनच टोमॅटो जे कि व्हिटॅमिन के ने भरपूर असते ते खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनतील. टोमॅटो मध्ये कॅलशियम देखील मोठ्या प्रमाणात असते जे कि हाडासोबतच दातांच्या मजबुतीसाठी सुद्धा खुप फायदेशीर असते. टोमॅटो हे दातांच्या चमक साठी देखील वापरतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
tomatto crop

tomatto crop

मित्रांनो सर्व्यात आधी जाणुन घ्या टोमॅटोचे फायदे (Benifits of Tomato)

 

»मित्रांनो आपल्या शरीरातील हाडासाठी व्हिटॅमिन के ची आवश्यकता असते. म्हणुनच टोमॅटो जे कि व्हिटॅमिन के ने भरपूर असते ते खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनतील. टोमॅटो मध्ये कॅलशियम देखील मोठ्या प्रमाणात असते जे कि हाडासोबतच दातांच्या मजबुतीसाठी सुद्धा खुप फायदेशीर असते. टोमॅटो हे दातांच्या चमक साठी देखील वापरतात.

»डोळ्यांच्या आजारासाठी टोमॅटोचे सेवन ठरू शकते फायदेमंद

टोमॅटो हे व्हिटॅमिनचे भांडारच आहे असेच म्हणावे लागेल, टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते जे कि डोळ्यांसाठी खुप उपयोगी असते. टोमॅटोच्या नियमित सेवणाने डोळ्यांच्या आजारांपासून नक्कीच वाचता येईल. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी टोमॅटोचे नियमित सेवन अवश्य केले पाहिजे.

जर तुम्हीही असाल लठ्ठपणाचे शिकार मग अवश्य खा टोमॅटो

टोमॅटो मध्ये खुप सारे व्हिटॅमिन्स आढळतात सोबतच त्यामध्ये फायबर आढळते जे कि आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे. सोबतच टोमॅटो मध्ये असलेले फायबर शरीरासाठी ऊर्जा निर्मितीच कार्य करते आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

 

 

 

 

 

टोमॅटोची नवीन वाण (New Variety Of Tomato)

 

टोमॅटोची लागवड शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा एक चांगले साधन आहे. टोमॅटोच्या काही जाती आहेत, ज्यात सहसा कीड किंवा रोग येत नाहीत. या वाणांची लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.  कीड

नियंत्रणावर आणि रोग नियंत्रणावर होणारा खर्च वाचतो. यामुळे साहजिकच जास्त नफा मिळतो. अशाच प्रकारची टोमॅटोची एक वाण म्हणजे अर्का रक्षक. डीडी किसानच्या अहवालानुसार, एक झाड 18 किलो पर्यंत उत्पादन देते.

सर्वात आधी भारतात अर्का रक्षक जातीच्या टोमॅटोची लागवड मणिपूरमध्ये 2012-13 मध्ये सुरू झाली. ह्या भागातील शेतकऱ्यांनी टोमॅटोवर येणारे रोगामुळे टोमॅटोची लागवड करणे सोडून दिले होते. जेव्हा कृषी शास्त्रज्ञांना याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ही नवीन वाण विकसित केली. आज अर्का रक्षक जातीच्या टोमॅटोची लागवड केवळ मणिपूरमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात केली जात आहे.

 

 

 

 

बाबोव!एका टोमॅटोचे वजन चक्क 100 ग्राम

 

कृषी शास्त्रज्ञ म्हणतात की अर्का रक्षक ही भारतातील पहिली तीन रोगाविरोधी प्रतिरोधक वाण आहे. ते तीन रोग म्हणजे लीफ कर्ल व्हायरस, बॅक्टेरियल ब्लाइट आणि पावसाळी ब्लाइट. ही वाण ह्या रोगापासून पूर्णतः संरक्षण देते. ह्या जातींचे F-1 संकरित प्रजातीतील एक झाड सुमारे 18 किलोपर्यंत टोमॅटोचे उत्पादन देऊ शकते. ही वाण 2010 मध्ये इंडियन हॉर्टिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, बेंगलोर यांनी विकसित केली होती. पूर्णपणे तयार झालेल्या टोमॅटोचे वजन सुमारे 90 ते 100 ग्रॅम असते.

 

 

 

टोमॅटो लागवडीसाठी, आपल्या शेतातील मातीचे पीएच मूल्य 6-7 यादरम्यान असेल तर ते टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य आहे. टोमॅटो लागवडीसाठी, आपली शेताची जमीन तीन ते चार वेळा खोल नांगरून घ्यावी त्यानंतर हेक्टरी 25-30 टन कुजलेले शेणखत शेतात टाकावे.  बियांच्या पेरणीनंतर शेणाचा पातळ थर जमिनीच्या पृष्ठभागावर पसरवावे. गादीवाफ्याला ऊन, थंडी किंवा पावसापासून वाचवण्यासाठी गवताने झाकुण टाकावे.

 

 

 

 

टोमॅटो शेती करणाऱ्यांसाठी महत्वाच्या टिप्स

 

टोमॅटो लागवडीच्या वेळी पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. लागवडीनंतर पहिले पाणी दिले जाते. यानंतर, गरजेनुसार टोमॅटो पिकाला 20 ते 25 दिवसांच्या अंतराने पाणी देणे उचित ठरते. चांगले उत्पादन मिळवण्यासाठी वेळोवेळी तण काढण्यासाठी निंदनी व खुरपणीही आवश्यक असते. टोमॅटो पिकावर कीड वगैरेचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकरी बांधव कीटकनाशकाची फवारणी करू शकतात.

 

जर तुम्ही टोमॅटोची लागवड करणार असाल आणि अधिक उत्पादन घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला दोन झाडांमधील अंतराची विशेष काळजी घ्यावी लागेल. दोन झाड आणि दोन ओळींमध्ये 60 सें.मी. अंतर हे योग्य असल्याचे मानले जाते. माती परीक्षणानुसार खतखाद्याचा कृषी वैज्ञानिकच्या सल्ल्याने वापर करावा. शेत तयार करताना हेक्टरी 25 ते 30 टन कुजलेले शेणखत लावावे. ह्या सर्व्या गोष्टी आपणांस टोमॅटो पिकातून चांगले उत्पन्न मिळवुन देतील.

 

 

 

 

English Summary: tommato new seeds benifit to farmer Published on: 06 September 2021, 01:27 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters