1. बातम्या

'गडकरींचे वाक्य मला आठवते की एखाद्याला आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला साखर कारखाना काढून द्या'

आजपासून पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन दिवसीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांना हात घातला, यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.

nitin gadkari sugar factory statement

nitin gadkari sugar factory statement

आजपासून पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन दिवसीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांना हात घातला, यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. सध्या साखर उत्पादन क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या समस्या आहे, यामध्ये यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच यातून मार्ग देखील काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की मला साखरेतील काही कळत नाही. प्रश्न आला की डाव्या आणि उजव्या बाजूला बघतो. मग त्यावर बाळासाहेब थोरात, अजितदादा, कधी राजेश टोपे मार्ग काढतात, शरद पवार यांचे अभिनंदन कारण त्यांनी साखरेचा गोडवा राजकारणात आणला आहे. त्यामुळेच राज्यातील सर्वपक्षीय राजकारणी इथे एकत्र आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच मी पवार साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण त्यांनी प्रेमाने आणि आदराने या कार्यक्रमासाठी बोलावले होत. पण मी अजून हळूहळू पावलं टाकतोय, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच गडकरींचे भाषण एकूण मला वाटले की आपणही साखर कारखाना काढावा. पण मी काढणार नाही. कारण गडकरींचेच वाक्य मला आठवते की एखाद्याला आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला साखर कारखाना काढून द्या, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मोठी बातमी!! भारतामध्ये लवकरच येणार लोकसंख्या नियंत्रण कायदा, मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

तसेच या क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्विकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. इथेनॉलकडे एक पर्यायी इंधन म्हणून पाहायला पाहिजे. राज्य सरकार इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महत्वाच्या बातम्या;
व्यापाऱ्यांनी कांदा विकला नाही, मग शेतकऱ्यांनी दाखवला हिसका, शेतकऱ्यांनो तुम्हीही करा असा प्रयोग
भारतीय गोवऱ्या पोहोचल्या जर्मनीत, लाखोंमध्ये मिळतेय ऑर्डर, एका गोवरीची किंमत तब्बल...
काय सांगता! चक्क 30 रुपयाला एक केळी, लाल केळी एवढी महाग का?

English Summary: 'I remember Gadkari's statement get out of life, give him sugar factory' Published on: 06 June 2022, 05:02 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters