1. बातम्या

पेट्रोल, डिझेल होणार २० रुपयांनी स्वस्त, मोदी सरकारकडून दिलासा मिळणार

गेल्या काही दिवसांपासून वाढलेले पेट्रोल आणि डिझलचे दर मोदी सरकार आणि ठाकरे सरकारने कमी केले. यामुळे पेट्रोलचे दर १० रुपयांनी कमी झाले. असे असताना आता अजून मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच तुम्हाला महागडे पेट्रोल आणि डिझेल भरण्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे संकेत दिले आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Petrol, diesel will be cheaper by rs 20

Petrol, diesel will be cheaper by rs 20

गेल्या काही दिवसांपासून वाढलेले पेट्रोल आणि डिझलचे दर मोदी सरकार आणि ठाकरे सरकारने कमी केले. यामुळे पेट्रोलचे दर १० रुपयांनी कमी झाले. असे असताना आता अजून मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच तुम्हाला महागडे पेट्रोल आणि डिझेल भरण्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे संकेत दिले आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. नुकताच जागतिक पर्यावरण दिन होता पार पडला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिली की, 'भकटने पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्यात मोठे यश मिळवले आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य भारताने निर्धारित वेळेच्या 5 महिने आधीच गाठले आहे. यामुळे याचा मोठा फायदा हा भविष्यात होणार आहे. आधी म्हणजेच 'वर्ष २०१४ मध्ये भारतात फक्त १.५ टक्के इथेनॉल मिश्रण झाले होते. इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे उद्दिष्ट साध्य केल्याने तीन फायदे मिळाले आहेत.

केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात इथेनॉलवर चालणारी वाहने लवकरच सुरू होऊ शकतात, असे संकेत दिले होते. त्यासाठी ते सरकार आणि कंपन्यांच्या पातळीवर चर्चा पुढे नेत आहेत. त्याच वेळी, सरकार हरित आणि पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. यामुळे पुढील दोन ते तीन वर्षात यामध्ये मोठे बदल दिसणार आहेत.

पंजाबच्या गाई जास्त दूध देतात आणि आपल्या का कमी देतात, शेतकऱ्यांनो वाचा करणे

यामुळे आता यामध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढल्यामुळे लोकांना महागडे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यापासून दिलासा मिळणार आहे. यामुळे २०२५ पर्यंत इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक लिटर इंधनामुळे सुमारे 20 रुपयांची बचत होईल, सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे याचा फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
'भीक मागून कृषिमंत्र्यांना पैसे देऊ पण कांद्याला रास्तच भाव घेऊ'
मोठी बातमी! पेट्रोल डिझेलनंतर आता स्टील आणि सिमेंटचे दरही केले कमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय...
'गडकरींचे वाक्य मला आठवते की एखाद्याला आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला साखर कारखाना काढून द्या'

English Summary: Petrol, diesel will cheaper Rs 20, will get relief Modi government Published on: 07 June 2022, 11:16 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters