नांदेड : सध्या राज्यात अतिउष्णता तर कधी वादळी वाऱ्यासह येणाऱ्या अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. कधी अति उष्णतेमुळे तर कधी वादळी वाऱ्यामुळे अनेक हादसे होत असतात. शिवाय अचानक आलेल्या या संकटांमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान देखील होत असते. सध्या नांदेडमधील नायगावमध्ये वादळी वाऱ्यानं चांगलंच थैमान घातलंय. वादळी वाऱ्यामुळे एक पत्रा उखडला गेला.
आणि हा पत्रा एका तरुणाच्या अंगावर पडणार होता. मात्र हा तरुण थोडक्यात बचावला गेला. अनेक घरांचे पत्रेदेखील या वादळात उडाले. या वादळामुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे. दोन तरुण बाईकवर बसत होते. एवढ्यात वाऱ्याच्या वेगानं एक पत्रा हवेत उडत त्यांच्या दिशेनं आला. मात्र तरूणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अनर्थ टाळला गेला.
निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान तर होतेच मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचे यात अमाप नुकसान होते. नांदेडमधील नायगावमध्ये झालेल्या या वादळीमुळे शेतातील पिकांचं आणि फळांचही नुकसान झालंय. यात आंब्यांचं वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालंय. शिवाय बरेच नागरिक वादळी वाऱ्यानं किरकोळ जखमीदेखील झाले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असानी वादळामुळे वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
महत्वाच्या बातम्या:
चक्रीवादळ आसनी: चक्रीवादळाचा मार्ग बदलला, महाराष्ट्रावर काय परिणाम, कुठे पडणार पाऊस?
शेतीला उत्तम फायदेशीर जोडधंदा!शेतीला अनुसरून व्यवसायला उत्तम पर्याय म्हणजे बटेर पालन-डॉ.शरद कठाळे सरांच्या मार्गदर्शनातुन
तुमच्याकडे कॉलेजची डिग्री नाही तर नो टेन्शन! आता सरकार देणार तुम्हाला 30000 प्रतिमहिना पगाराची नोकरी- मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
Share your comments