1. बातम्या

तुमच्याकडे कॉलेजची डिग्री नाही तर नो टेन्शन! आता सरकार देणार तुम्हाला 30000 प्रतिमहिना पगाराची नोकरी- मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

सध्या असंख्य पदवीधारक नोकरीच्या शोधात वणवण भटकताना दिसतात. परंतु काही केल्या नोकरी मिळत नाही. अगदी आपण शिपाई पदासाठी परीक्षेचा विचार केला तर अक्षरशः एमबीए, मास्टर ग्रॅज्युएट झालेले तरुण आणि तरुणी या परीक्षेला आलेले असतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
will be coming next few year one lakh job creat in dron sector of pilot post

will be coming next few year one lakh job creat in dron sector of pilot post

सध्या असंख्य पदवीधारक नोकरीच्या शोधात वणवण भटकताना दिसतात. परंतु काही केल्या नोकरी मिळत नाही. अगदी आपण  शिपाई पदासाठी परीक्षेचा विचार केला तर अक्षरशः एमबीए, मास्टर ग्रॅज्युएट झालेले तरुण आणि तरुणी या परीक्षेला आलेले असतात.

यावरून या प्रश्नाची दाहकता आणि गंभीरता लक्षात येते.तसे पाहायला गेले तर शासनाकडून देखील विविध पद्धतीने रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येतात. परंतु हे प्रयत्न खूपच तोडके आहेत. या सगळ्यात गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

 सरकार देणार तरुणांना नोकरी

 मागील काही दिवसांपासून सरकारने शेतीमध्ये ड्रोन वापरायला परवानगी दिली असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत  परंतु त्यांच्याकडे कुठलीही पदवी नाही, अशा तरुणांना सरकार येणाऱ्या  काही वर्षात नोकरीची संधी देणारा असून ती ड्रोनशी संबंधित आहे. सरकारकडून येणाऱ्या काही वर्षात देशात एक लाखांपेक्षा अधिक ड्रोन पायलटची भरती करण्यात येणार असल्याचे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या पायलट भरतीसाठी कुठल्याही प्रकारची डिग्रीच्या आवश्यकता नाही.

या माध्यमातून ड्रोनच्या वापराला  प्रोत्साहन आणि उत्तेजन  देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात ड्रोन पायलटची बंपर भरती होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी अगदी बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार ड्रोन पायलटचे प्रशिक्षण घेऊ शकतात. येणाऱ्या काही वर्षांमध्ये जवळजवळ एक लाख पेक्षा जास्त ड्रोन पायलटचे आवश्यकता भासणार असून  ज्या तरुणांना ड्रोन पायलेट होण्याची इच्छा असेल अशा तरुणांना ड्रोन  पायलटचे दोन ते  तीन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ड्रोन पायलट साठी निवड झालेल्या उमेदवारांना तीस हजार रुपये मासिक पगार मिळेल अशी माहिती देखील ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.तसेच 2030 पर्यंत भारताला  ग्लोबल ड्रोन हब बनवण्याचे लक्ष असल्याचे देखिले ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

कृषी क्षेत्रा सोबतच औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये देखील ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

 महत्वाच्या बातम्या                        

नक्की वाचा:2030 पर्यंत भारत जागतिक ड्रोन हब बनणार: सिंधिया

नक्की वाचा:शेतीला उत्तम फायदेशीर जोडधंदा!शेतीला अनुसरून व्यवसायला उत्तम पर्याय म्हणजे बटेर पालन-डॉ.शरद कठाळे सरांच्या मार्गदर्शनातुन

नक्की वाचा:नात्याचा प्रेमळ बंध! बिबट्याचा बछडा आठवडाभर दीड वर्षाच्या 'तन्वी'च्या अंगाखांद्यावर खेळला, वनविभागाच्या ताब्यात देताना सर्वांना अश्रू अनावर

English Summary: will be coming next few year one lakh job creat in dron sector of pilot post Published on: 11 May 2022, 11:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters