नोकरी करणारांसाठी सध्या एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या मोदी सरकार (Centre government) चार नवीन लेबर कोड लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे याचा अनेकांना फायदा होईल. यामध्ये नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर कार्यालयांमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर कामाचे तास, पगार आणि पीएफ बदलणार आहे. यामुळे नोकरी करणारांचे याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सरकार 1 जुलैपासून नवीन वेतन संहिता लागू करण्याचा विचार करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. केंद्राच्या कामगार संहितेनुसार देशातील 23 राज्यांनी त्यांचे कामगार कायदे बनवले आहेत.लवकरच चार लेबर कोड लागू केले जातील. त्याच्या अंमलबजावणीनंतर, पगार, कार्यालयीन वेळेपासून पीएफ निवृत्तीपर्यंतच्या नियमांमध्ये बदल होईल, असे
सरकारच्या अंदाजानुसार, देशात असंघटित क्षेत्रात सुमारे 38 कोटी कामगार आहेत. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले. यामध्ये नवीन वेतन संहितेत कामाचे तास 12 तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. आठवड्यानुसार 4-3 च्या प्रमाणात विभागले जाते. म्हणजे 4 दिवस ऑफिस, 3 दिवस आठवडा सुट्टी. दर 5 तासांनी कर्मचाऱ्यांना 30 मिनिटांचा ब्रेक देण्याचा प्रस्ताव आहे.
शेतकऱ्यांनो विजांपासून करा तुमचे संरक्षण, दामिनी अॅपमुळे वाचणार जीव
तसेच यामध्ये कर्मचार्याचे मूळ वेतन कंपनीच्या (CTC) खर्चाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. वेतन संहिता लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा टेक होम पगार कमी होणार आहे. नवीन वेतन संहिता कायद्यानुसार अनेक बदल करण्यात आले आहेत, यामुळे आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच नवीन वेतन संहितेत 30 मिनिटे मोजून ओव्हरटाइममध्ये 15 ते 30 मिनिटांच्या अतिरिक्त कामाचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.
महत्वाच्या बातम्या;
घोडगंगाचा कोजन, डिस्टलरी प्रकल्प आला नफ्यात, शेतकऱ्यांना होणार फायदा
शेतकऱ्यांनो शेळीपालनातून लाखोंची कमाई करा, कर्ज आणि सबसिडी जाणून घ्या
पाकिस्तानमध्ये वाढतेय गाढवांची संख्या, कारण ठरतंय चीन...
Share your comments