1. बातम्या

शेतकऱ्यांनो विजांपासून करा तुमचे संरक्षण, दामिनी अ‍ॅपमुळे वाचणार जीव

वीज अंगावर पडून अनेक शेतकऱ्यांचा आणि जनावरांचा मृत्यू होतो, अशा बातम्या देखील आपण बघितल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र आता यावर एक उपाय आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने असे एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे जे वीज पडण्यापूर्वी 15 मिनिट अलर्ट देईल.

सध्या पावसाचे दिवस चालू आहेत. यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरु आहेत. शेतकऱ्यांना रात्री अपरात्री घराबाहेर पडावे लागत आहे. यामुळे अनेकदा हे धोक्याचे देखील ठरते. पावसाळ्यात अनेकदा जोरदार वारा आणि विजांचा कडकडाट बघायला मिळतो. वीज अंगावर पडून अनेक शेतकऱ्यांचा आणि जनावरांचा मृत्यू होतो, अशा बातम्या देखील आपण बघितल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र आता यावर एक उपाय आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारने असे एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे जे वीज पडण्यापूर्वी 15 मिनिट अलर्ट देईल. यामुळे काही घडायच्या आधीच तुम्हाला त्याची माहिती होणार आहे. या अ‍ॅपचे नाव दामिनी अ‍ॅप असे आहे, जो शेतकरी रानामाळात अधिक धोक्याच्या ठिकाणी काम करतो त्याला हे अधिक उपयोगी पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या मोबाईल अ‍ॅपबद्दल अधिकची माहिती असणे गरजेचे आहे. यामुळे याचा अनेकांना फायदा होणार आहे.

हे अ‍ॅप जीपीएस लोकेशनद्वारे काम करते. वीज पडण्याच्या 15 मिनिट आगोदर अ‍ॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. त्यामुळे आपल्या अ‍ॅपमध्ये वीज पडणार असल्याच्या सुचना मिळतात. यामुळे शेतकऱ्याला सुरक्षित ठिकाणी जाता येते, तसेच जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी घेऊन जाता येणार आहे. दामिनी अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येते. यामुळे आता शेतकऱ्यांची काळजी मिटणार आहे.

कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश, पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली..

गावात स्थानिक पातळीवर काम करणारे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल सहाय्यक यांना हे अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. याद्वारे शेतकऱ्यांना हे अ‍ॅप कसे चालवायचे हे सांगितले जाणार आहे. यामुळे ही देखील काळजी मिटणार आहे. यामुळे हे अ‍ॅप शेतकऱ्यांना उपयोगी पडेल .

महत्वाच्या बातम्या;
...तर सरपंचांना द्यावा लागणार राजीनामा! महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती
Mansoon 2022: पंजाबरावांचा जून महिन्याचा मान्सून अंदाज जाहीर, शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला
तब्बल 4 टर्मपासून साखर कारखाना बिनविरोध, राज्यात केलाय वेगळाच आदर्श निर्माण..

English Summary: Farmers, protect yourself from lightning, Damini app will save lives Published on: 12 June 2022, 05:45 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters