1. यशोगाथा

नोकरी सोडून आपला कल ओळवला शेतीकडे,आता वर्षाकाठी घेतात १५ लाख रुपयांचे उत्पादन

आजच्या युगामध्ये लोक नोकरी सोडून आपला कल शेतीकडे ओळवत आहे जे की एका व्यक्तीने नोकरी सोडून शेतीमध्ये यशाचे शिखर गाठले आहे. आज प्रति वर्ष आधुनिक शेतीमधून ते १५ लाखांचे उत्पादन घेत आहेत असे या शेतकऱ्याचे नाव राजू निमकर असे आहे जे की तालुका कळमेश्वर मधील बुधला या गावामध्ये राहतात.

किरण भेकणे
किरण भेकणे
agriculture

agriculture

आजच्या युगामध्ये लोक नोकरी(job) सोडून आपला कल शेतीकडे ओळवत आहे जे की एका व्यक्तीने नोकरी सोडून शेतीमध्ये यशाचे शिखर गाठले आहे. आज प्रति वर्ष आधुनिक शेतीमधून ते १५ लाखांचे उत्पादन घेत आहेत असे या शेतकऱ्याचे नाव राजू निमकर असे आहे जे की तालुका कळमेश्वर मधील बुधला या गावामध्ये राहतात.

घेतली कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी :

राजू निमकर यांचे वडील पदवीधर होते त्यामुळे ते नगरखेड पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी होते मात्र कुटुंब मोठे जसे की त्यांना तीन मुले आणि तीन मुली व आई वडील आणि त्यांची पत्नी असे मोठे कुटुंब असल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह करण्याची पूर्ण जबाबदारी  निमकर  यांच्यावर  होती.  एवढ्या  मोठ्या संसाराचा गाढा नीट चालवण्यासाठी पैशाची कमी पडणे साहजिक होते त्यामुळे निमकर यांनी नोकरी सोडून शेती  करण्याचा  मार्ग  अवलंबला  आणि  अशा परिस्थितीमध्ये राजू निमकर यांचे शिक्षण अपूर्णच राहिले.

हेही वाचा:वैद्यकीय अधिकाऱ्याने पारंपरिक शेती करून फुलवला ड्रॅगन फ्रुट चा मळा

आयुष्यात काहीतरी चांगले केले पाहिजे त्यामुळे त्यांचे मन सारखे चलबिचल होयचे त्यामुळे त्यांनी सर्वात पहिल्यांदा  दूध व्यवसाय  चालू  केला त्यामध्ये  त्यांना पहिल्या दिवशी दोन रुपये नफा मिळाला, निमकर दूध व्यवसायसोबत शेतीकडे सुद्धा लक्ष केंद्रित करत होते. २००३  साली निमकर  यांनी संत्रा  फळबाग  ची लागवड केली तसेच ट्रॅक्टर घेण्यास बँक कर्ज देत नसल्याने त्यांनी जुना ट्रॅक्टर घेऊन स्वतःच्या शेतीसोबत इतर  शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये सुद्धा  ट्रॅक्टर  ची कामे करत होते.ज्यावेळी शेती करायचे ठरवले त्यावेळी नक्की करायचे काय यामध्येच त्यांची ५ वर्ष गेली जे की आधी शेतीसाठी  ज्या मूलभूत  गरजा  आहेत  त्या आपल्या जवळ असायला पाहिजेत असे त्यांना वाटले त्यामुळे त्यांनी २००८ मध्ये बोअरवेल घेतले त्यासाठी  त्यांचे ३.५ लाख रुपये  खर्च झाले  पण  एवढे  पाणी शेतीला पुरणार नाही त्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची पाईप लाईन केली.

जलसिंचन ची जुनी पद्धत वापरून त्यांनी झाडांना पाणी द्यायला तर सुरू केले मात्र झाडाच्या बुंध्याला रोग येत असल्याचे त्यांना दिसले त्यामुळे त्यांनी जुनी पद्धत सोडली आणि ड्रीप करून घेतले. या नवीन पद्धतीमुळे त्यांना बुरशी रोगापासून सुटका भेटली. त्यामुळे अत्ता सिंचनाचा खर्च आणि मजुरीचा खर्च सुद्धा  वाचला, तसेच एका झाडाला ३ रुपये खर्च यायचा त्याप्रमाणे २५० झाडाला ७५० रुपये खर्च  पडतो. वर्षाला २५०  झाडांना २८ ते ३०  पाण्याच्या  पाळ्या द्याव्या  लागतात त्याला जवळपास २६००० खर्च येतो. यापेक्षा तीन वर्षे लागणाऱ्या खर्चात पुढे दहा वर्षे ठिबक सिंचन तयार होऊ शकते असे त्यांना समजले.

English Summary: Leaving his job and shifting his focus to agriculture, he now earns Rs 15 lakh a year Published on: 12 August 2021, 02:15 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters