1. इतर बातम्या

२४ सप्टेंबरला तब्बल ५९ वर्षांनी राजयोग: 'या' ५ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेचे मिळणार वरदान

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Rajyoga

Rajyoga

२४ सप्टेंबरला तब्बल ५९ वर्षांनी एक दुर्लभ योग तयार होत आहे. 12 राशींपैकी पाच राशींना व्यवसाय आणि करिअरमध्ये भरपूर यश मिळणार आहे, असे म्हंटले जात आहे. या पाच लकी राशीबद्दल आज आपण जाणून घेऊया...

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांबद्दल आपण पाहिले तर, वृषभ राशीच्या व्यक्तींना हे अद्भूत दुर्मिळ राजयोग फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आगामी काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचा स्वामी शुक्र नीच स्थितीत राहील. त्यामुळे दुर्बल राजयोग असणार आहे.

यासोबतच नवपंचम आणि समसप्तक योगही जुळून येत असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासह पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली; भाज्यांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना हे अद्भूत दुर्मिळ राजयोग यशकारक ठरू शकतात. हंस नामक राजयोगामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित पाहिजे तसे यश मिळू शकेल. विशेष म्हणजे जीवनसाथीच्या माध्यमातून संपत्ती मिळू शकते.

जे लोक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत, अशा लोकांसाठी ही वेळ भाग्यशाली ठरणार आहे. या काळात या लोकांना मोठे पद मिळू शकते. तसेच त्यांची प्रतिष्ठा वाढू शकते. केंद्रस्थानी तीन शुभ ग्रह आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथही मिळू शकते, असे बोलले जात आहे.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींना हे अद्भूत दुर्मिळ राजयोग प्रगतीकारक ठरू शकतात. या राशीचा स्वामी बुध ग्रह उत्तम स्थितीत आहे. त्यामुळे व्यवसायात चांगले यश मिळू शकते.

त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. ज्या व्यक्ती माध्यम, चित्रपट या क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. तसेच तुमचे रखडलेले काम यावेळी पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. यासह तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते.

शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीव नुकसान भरपाई मिळणार; सरकारकडून अधिसूचना जारी

धनू

धनु राशीच्या व्यक्तींना हे अद्भूत दुर्मिळ राजयोग अनुकूल ठरू शकतात. या कालावधीत हंस, नीचभंग आणि भद्रा नावाचा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या काळात धनू राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले पैसे कमवू शकतात.

तसेच महत्वाचे म्हणजे नवीन करार अंतिम केल्यामुळे भविष्यात फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. विशेष म्हणजे यावेळी केलेला व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरू शकतो.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना हे अद्भूत दुर्मिळ राजयोग खूप चांगले ठरू शकतात. शनीदेव लाभदायक स्थानावर विराजमान आहेत. नीचभंग आणि भद्रा नावाचा राजयोग तयार झाल्यामुळे मीन राशीच्या लोकांना यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो तारणकर्ज योजनेचा लाभ घेऊन चांगल्या दराने धान्य विक्री करा; जाणून घ्या प्रक्रिया
ऐण सणासुदीच्या काळात तांदूळ महागणार; सर्वसामान्यांना मोजावे लागणार जादा पैसे
सरकारच्या 'या' योजनेत 1 लाख रूपयांचे होतील 5 लाख रुपये; एकदा गुंतवणूक करून पहाच

English Summary: Rajyoga after 59 years September 24 Published on: 19 September 2022, 05:51 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters