Petrol, Diesel Price:पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. अशातच दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देणारी घोषणा केली. यात महा विकास आघाडी सरकारने पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धित करामध्ये 2.08 आणि 1.44 पैशांची कपात केली. त्यामुळे राज्यातील इंधन दरात कपात झाल्याने सर्वच नागरिकांना दिलासा मिळाला. दर कपाताबाबत घेतलेला निर्णय तात्काळ प्रभावाने लागू होईल असं अश्वासनदेखील देण्यात आलं होतं.
मात्र निर्णय घेऊन दोन दिवस झाले तरी देखील त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. अजूनही पेट्रोल, डिझेलच्या दरात सांगितल्याप्रमाणे कपात न झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकतीच अबकारी करात केंद्र सरकारने दुसऱ्यांदा कपात केली होती.पाहिली कपात ही दिवाळी च्या दरम्यान करण्यात आली होती. इतर राज्याने कर देखील कमी केले होते. मात्र तरीही महाराष्ट्र राज्य सरकारने त्यावेळी कर कापाताबाबत कोणताच निर्णय घेतला नव्हता.
आता मात्र जेव्हा अबकारी करात दुसऱ्यांदा कपात केली गेली तेव्हा राज्य सरकारने व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी जेव्हा पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धितकर कपातीचा निर्णय घेण्यात आला, तेंव्हा २१ मे पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती तसेच औरंगाबाद महापालिका हद्दीत पेट्रोलवर प्रतिलिटर ३२ रुपये ९० पैशांऐवजी आता ३० रुपये ८२ पैसे आणि डिझेलवर प्रतिलिटर २२ रुपये ७० पैशांऐवजी आता २१ रुपये २६ पैसे इतका मूल्यवर्धित कर असेल.
Important Research: कॅल्शियमच्या गोळ्या खातात का? तर सावधान! या गोळ्यांमुळे वयस्करातील हृदयविकाराने 33 टक्के वाढते मृत्यूची शक्यता
शिवाय उर्वरित महाराष्ट्रात २१ मे २०२२ पासून पेट्रोल वर प्रतिलिटर सरासरी ३२ रु. ८० पैशांऐवजी आता ३० रु. ८० पैसे इतका तर डिझेल वर प्रतिलिटर २० रु. ८९ पैशांऐवजी आता १९ रु. ६३ पैसे एवढा मूल्यवर्धित कर असेल. आणि याची सर्व ऑइल कंपन्या पेट्रोल पंपधारकांनी नोंद करावी आणि त्यापद्धतीने कर आकारणी करावी अशी महाराष्ट्र सरकारने सामांन्यांना दिलासा देत घोषणा केली होती.
IMD Alert : मान्सून अडकला; महाराष्ट्रातील मान्सूनची तारीख बदलली, जाऊन घ्या तारीख..
असं असताना देखील पेट्रोलियम कंपन्यांनी यावर कोणतीच अंमलबजावणी केली नाही. पेट्रोल, डिझेलच्या दरात अजूनही कपात झाली नाही. यातून कंपन्या राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करत नाही असंच चित्र दिसत आहे. राज्य सरकारने व्हॅट कमी करून लगेचच कपात करण्याचा निर्णय घेतला असूनही
कंपन्या इंधनाचे दर कमी करण्याचे काम मनावर घेत नाहीयेत. त्यामुळे आता इंधन दर कमी होणार की नाही आणि होणार असेल तर कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
राज्यात ६६ हजार लोकांना मिळणार नोकऱ्या, दावोस इकॉनॉमिक कौन्सिलमध्ये ३० हजार कोटींचा करार
Share your comments