1. इतर बातम्या

आताची सर्वात मोठी बातमी! पेट्रोल- डिझेल होणार स्वस्त, मोदी सरकारने थेट तारीखच सांगितली..

मोदी सरकार(Modi government) ने २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोल मध्ये मिश्रण करू असे सांगितले होते. मात्र आता २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Petrol-diesel will be cheaper

Petrol-diesel will be cheaper

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल - डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे अनेकांनी इलेक्ट्रिक गाडीचा पर्याय निवडला आहे. असे असताना आता याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकार(Modi government) ने २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोल मध्ये मिश्रण करू असे सांगितले होते. मात्र आता २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत मोदी सरकारने तारीख जाहीर केली आहे. १ एप्रिल २०२३ पासून इथेनॉल २० टक्के मिश्रित पेट्रोल उपलब्ध होणार त्यामुळे थेट पेट्रोल - डिझेल च्या दरात मोठी कपात होईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे अजून थोडे दिवस याबाबत प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे असले तरी आता किती रुपयांनी याचे दर कमी होणार याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे.

सध्या तेलाची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. आता सध्या पेट्रेलमध्ये ८ टक्के इथेनॉल मिक्स करण्याऐवजी २० टक्के करण्यात येणार आहे. यामुळे याचा भार काहीसा कमी होणार आहे, यामुळे याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. पेट्रोलमध्ये जर इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आला तर शेतकऱ्यांचा मोठा फायदा(Big advantage) होणार आहे.

पुराच्या पाण्यात पाय भिजतील म्हणून भाजप आमदार कर्मचाऱ्याच्या पाठीवर

यामुळे शेतकरी यासाठी आग्रही आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळणार आहे. इथेनॉल हे एक प्रकारे अल्कोहोल असते. यामुळे १ एप्रिल २०२३ पासून इथेनॉल २० टक्के मिश्रित पेट्रोल उपलब्ध होणार त्यामुळे थेट पेट्रोल - डिझेल च्या दरात मोठी कपात होईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे आता याची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
अतिरिक्त उसाचा प्रश्न कोणामुळे? शिल्लक उसाची खरी कारणे आली समोर...
मोठी बातमी! एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा, साखर सहसंचालकांचे आदेश
कृषी विकास दराबाबत आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..

English Summary: The biggest news of all time! Petrol-diesel will be cheaper, Modi government directly announced the date .. Published on: 21 May 2022, 11:17 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters