आपल्या देशात लग्नाबाबत अनेक घटना घडत असतात. असाच काहीसा प्रकार आता एका आमदाराच्या बाबतीत घडला आहे. यामुळे या आमदाराची सध्या चर्चा सुरु आहे. या आमदाराच्या विरोधात त्यांच्याच लग्नाला न पोहोचल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओडिसामधील बीजू जनता दल (बीजद)चे आमदार विजय शंकर दास (BJD MLA Bijaya Shankar Das) हे आपल्याच लग्नाला पोहोचले नाहीत, यामुळे चर्चा सुरु आहे.
महिलेने आमदारावर आरोप केला आहे की, वचन देऊनही हे आमदार विवाह नोंदणी कार्यालयात आले नाहीत. जगतसिंहपूर सदर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रवास साहू यांनी सांगितलं की, आमदार दास यांच्याविरोधात या महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. ही महिला आणि आमदार दास यांनी 17 मे रोजी विवाह नोंदणी कार्यालयात लग्नासाठी अर्ज केला होता. यानंतर सगळं काही व्यवस्थित सुरु होते.
ठरलेल्या दिवशी ही महिला तिच्या परिवारासह लग्नासाठी विवाह नोंदणी कार्यालयात पोहोचली. मात्र आमदार विजय शंकर दास तिथं आले नाहीत. महिलेनं दावा केला आहे की, गेल्या तीन वर्षांपासून आमचे संबंध आहेत. आमदाराने लग्नाचे वचन दिले होते. असे असताना मात्र ते आले नाहीत. मला आता त्यांचा भाऊ आणि त्यांच्या परिवारातील अन्य सदस्याकडून धमक्या येत आहेत. ते माझा फोन देखील उचलत नाहीत. असेही या महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
भोपळ्याचा रस ठरला वरदान! अनेक रुग्णांना झाला फायदा, वाचा आश्चर्यजनक फायदे
याबाबत आमदार आमदार म्हणाले की, मी लग्नाला नकार दिलेलाच नाही. लग्नाच्या नोंदणीसाठी 60 दिवस बाकी आहेत. त्यामुळं मी आलो नाही. मला तिने काहीही कल्पना दिली नाही. विवाह नोंदणी कार्यालयात जाण्याबाबत मला काहीच माहिती नव्हती. असे असताना त्यांचे फोटो मात्र सगळीकडे व्हायरल झाले आहेत. यामुळे आता पोलीस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो थांबा!! राज्यात केवळ एक टक्केच पेरणी, पावसाअभावी पेरण्या थांबल्या...
किसानपुत्रांनी पाळला काळा दिवस, घरावर काळे झेंडे लावून केला सरकारचा निषेध
लसणाची एक पाकळी झोपताना उशीखाली नक्की ठेवा, आयुष्यात होतील मोठे बदल..
Share your comments