1. हवामान

शेतकऱ्यांनो थांबा!! राज्यात केवळ एक टक्केच पेरणी, पावसाअभावी पेरण्या थांबल्या...

अजून पावसाचा पत्ता नाही, यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहेत. पावसाअभावी सध्या शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ एक टक्केच पेरण्या झाल्या आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी राज्यातील शेतकरी सज्ज झाले आहेत. 75 मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे शेतकरी पावसाकडे लक्ष देऊन आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
one percent sowing in the state

one percent sowing in the state

हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस पडेल असे सांगितले असताना अजून पावसाचा पत्ता नाही, यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहेत. पावसाअभावी सध्या शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ एक टक्केच पेरण्या झाल्या आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी राज्यातील शेतकरी सज्ज झाले आहेत. 75 मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे शेतकरी पावसाकडे लक्ष देऊन आहेत.

सध्या जून अर्धा संपला तरी पाऊस पडला नाही. पावसाने ओढ दिल्याने बहुतेक धरणांनी आता तळ गाठला असून, पाऊस लांबल्याने जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गतवर्षी 17 जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसानं दांडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे.

यामुळे पेरणीची घाई करु नये असे कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरु शकते. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं जे आज परवडणार नाही. जूनमध्ये पाऊस कमीच पडेल, असेही आता म्हटले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात तरी पाऊस पडणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लसणाची एक पाकळी झोपताना उशीखाली नक्की ठेवा, आयुष्यात होतील मोठे बदल..

हिंगोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अजून कसलाच पाऊस पडला नाही. यामुळे याठिकाणी आता शेतकरी चिंतेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला आहे, मात्र धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

महत्वाच्या बातम्या;
भोपळ्याचा रस ठरला वरदान! अनेक रुग्णांना झाला फायदा, वाचा आश्चर्यजनक फायदे
लसणाची एक पाकळी झोपताना उशीखाली नक्की ठेवा, आयुष्यात होतील मोठे बदल..
किसानपुत्रांनी पाळला काळा दिवस, घरावर काळे झेंडे लावून केला सरकारचा निषेध

English Summary: Farmers wait !! Only one percent sowing in the state, sowing stopped due to lack of rain ... Published on: 18 June 2022, 03:02 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters