1. आरोग्य सल्ला

भोपळ्याचा रस ठरला वरदान! अनेक रुग्णांना झाला फायदा, वाचा आश्चर्यजनक फायदे

कच्च्या भोपळ्यापासून (Pumpkin juice) बनवलेल्या रसामध्ये A, B1, B2, B6, C, D, E आणि महत्त्वाचे फ्लेव्होनॉइड्स आणि पॉली-फेनोलिक अँटिऑक्सिडंट्स जसे की ल्युटीन, झेंथिन आणि कॅरोटीन सारखे जीवनसत्त्वे असतात. भोपळ्याचा रस विविध आरोग्य फायद्यांसह आश्चर्यकारकपणे निरोगी पेय बनवतो. याच्या रसामुळे यकृत आणि मूत्रपिंडासाठी चांगले राहते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Pumpkin juice is a boon

Pumpkin juice is a boon

आपण अनेकदा केमिकलयुक्त आणि शरीराला हानिकारक अशा अनेक औषधांचा वापर करत असतो. यामुळे आपल्याला लगेच आराम तर मिळतो, मात्र याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. मात्र आपण घरात उपलब्ध असलेल्या पालेभाज्यांचा वापर केला तर आपल्याला याचा फायदा होईल. यामध्ये कच्च्या भोपळ्यापासून (Pumpkin juice) बनवलेल्या रसामध्ये A, B1, B2, B6, C, D, E आणि महत्त्वाचे फ्लेव्होनॉइड्स आणि पॉली-फेनोलिक अँटिऑक्सिडंट्स जसे की ल्युटीन, झेंथिन आणि कॅरोटीन सारखे जीवनसत्त्वे असतात.

भोपळ्याचा रस विविध आरोग्य फायद्यांसह आश्चर्यकारकपणे निरोगी पेय बनवतो. याच्या रसामुळे यकृत आणि मूत्रपिंडासाठी चांगले राहते, किडनी स्टोन आणि पित्त मूत्राशयाच्या समस्यांनी त्रस्त असलेले लोक १० दिवस दिवसातून तीनदा अर्धा ग्लास भोपळ्याचा रस पिऊन आराम मिळू शकतो, भोपळ्याचा रस रक्तवाहिन्यांमधील अडचणी दूर करतो, यामुळे हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.

अनेक अभ्यास निद्रानाश बरा करण्यासाठी भोपळ्याच्या रसाची प्रभावीता दर्शवतात. एक ग्लास भोपळ्याच्या रसात मध मिसळून झोप येण्यास मदत होते. भोपळ्याच्या रसामध्ये विविध प्रकारचे फायटोस्टेरॉल आणि पेक्टिन्स असतात जे एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. भोपळ्याचा रस हा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि शरीराचे संरक्षण करतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

भूसंपादन केलेल्या जमिनीवर सरकारचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

मधासह भोपळ्याचा रस बाह्य उष्णतेविरूद्ध शीतलक म्हणून काम करतो आणि उन्हाळ्यात एक परिपूर्ण पेय बनवतो. यामुळे तो फायदेशीर ठरतो. तसेच गर्भवती महिलांना मॉर्निंग सिकनेसपासून आराम मिळण्यासाठी भोपळ्याचा रस प्रभावी आहे. यामुळे तुम्हाला यामध्ये काही आजार असतील तर ते घरच्या घरीच दूर होतील. यामुळे तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज लागणार नाही.

महत्वाच्या बातम्या;
तरुणांनो नोकरीत पैसे मिळत नसतील तर सुरु करा अ‍ॅग्रीकल्चर स्टार्टअप, सरकार देणार २५ लाख रुपये
सिंचन उपकरणांमुळे पाणी आणि पैसा दोन्हीची बचत होणार, शासनाकडून 90% अनुदान
सिंचन उपकरणांमुळे पाणी आणि पैसा दोन्हीची बचत होणार, शासनाकडून 90% अनुदान

English Summary: Pumpkin juice is a boon! Benefited many patients, read the amazing benefits Published on: 18 June 2022, 12:13 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters