हौस म्हणून तर कधी त्या प्राण्यांबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्याचा सांभाळ करण्यासाठी पाळीव प्राणी पाळण्याचा आपला सगळ्यांचाच अट्टहास असतो. पाळीव प्राणी घरात असल्याचे अनेक फायदे आहेत. पाळीव प्राण्यामुळे घरातील वातावरण आंनदी राहते. चिंता आणि ताण कमी होतो. संशोधनात असंही आढळून आले आहे की, पाळीव प्राण्यांमुळे रक्तदाबाचा त्रास कमी होण्याची शक्यता असते. तसेच एकटेपणा जाणवत नाही.
तर काही लोक प्राणी शुभ आहे म्हणूनदेखील पाळतात. कासव त्यापैकीच एक. मात्र स्टार प्रजातीचे कासव पाळण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रजातीच्या कासव पाळल्यामुळे अनेकदा कारवाई देखील करण्यात आली आहे. मुंगूस या प्राण्याला देखील आपल्याकडे शुभ मानले जाते. पण तो प्राणी शुभ आहे म्हणून जर तुम्ही त्याला पाळण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच. मुंगूस प्राणी पाळल्याने वनविभागाकडून कारवाई केल्याची घटना सध्या समोर आली आहे.
खरंतर आपल्याकडे मुगुंसाचे तोंड पाहणे शुभ मानले जाते. त्याने संपूर्ण दिवस चांगला जातो तसेच धनप्राप्ती होते असं म्हटलं जात. मात्र अंधश्रद्धा बाळगणे डोंबिवलीतील विठ्ठल जोशी यांना चांगलंच महागात पडले आहे. पिंजऱ्यात चार मुंगूस पाळल्याची घटना समोर आली असून या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच त्यांच्या पथकाने तातडीने त्या परिसरात जाऊन पिंजऱ्यातून चार मुंगुसांची सुटका केली. या अमान्य प्रकारामुळे मुंगूस पाळणाऱ्यांविरोधात कारवाईदेखील केली.
शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकार आक्रमक; तब्ब्ल 2 कोटींचे बियाणे जप्त
विठ्ठल जोशी हे डोंबिवलीच्या पश्चिमेकडील शास्त्री नगर जुनी डोंबिवली भागात आपल्या कुटुंबासह राहतात. रोज मुंगूसचा चेहरा पाहिल्यावर दिवस चांगला जातो तसेच धनप्राप्ती होत असल्याचा विठ्ठल जोशी यांचा समज होता. याच अंधश्रद्धेतून त्यांनी अखेर मुंगूस पाळण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर जंगलातून चार मुंगूस पकडुन आणून ते पिंजऱ्यात ठेवले. या कृत्याची वनविभागाच्या पथकाला माहिती मिळाली.
माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने विठ्ठल जोशी यांच्या घराची झडती घेतली व पिंजऱ्यात बंद असलेले हे चार हे मुंगूस ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्याअंतर्गत मुंगूस पाळणे हा कायदेशीर गुन्हा असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय कायद्याने बंदी असलेले वन्यजीव प्राणी न पाळण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आता वाघ, बिबट्यांची दहशद होणार कमी; वन परिक्षेत्राच्या वतीने बांधकामाला सुरुवात
ठाकरे सरकारची पशुपालन योजना; शेतकऱ्यांना मिळतायेत गायी आणि म्हशी
Share your comments