1. इतर बातम्या

Horoscope Today; या लोकांना आज मिळणार बाप्पाचा आशीर्वाद; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

मेष राशीच्या लोकांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक (family) नात्याला वेळ देण्याची सध्या गरज आहे. जुने वाद-विवाद विसरून नात्याला नव्याने सुरुवात होण्याची शक्यता आहे. नव्या जोमाने स्वतःला नेहमीच्या कामांमध्ये झोकून द्या.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Horoscope

Horoscope

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक (family) नात्याला वेळ देण्याची सध्या गरज आहे. जुने वाद-विवाद विसरून नात्याला नव्याने सुरुवात होण्याची शक्यता आहे. नव्या जोमाने स्वतःला नेहमीच्या कामांमध्ये झोकून द्या.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नव्या आव्हानांचा असेल. आता तुम्हाला कोणत्याही घरगुती गोष्टी टाळण्याची इच्छा होऊ शकते. एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल, असे संकेत आहेत. तुम्ही पुढे गेला असाल तर पुन्हा मागे येऊ नका.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. कारण काही जणांना तुमची जागा मिळवण्याची इच्छा आहे. त्यामुळे खासकरून कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नियोजनाबाबत कोणाशीही बोलताना काळजी घ्यावी लागेल. आईच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल.

कर्क (Cancer)

तुमची एखादी सहल पुढे ढकलली गेली, तर ते चांगल्यासाठीच होतं असं माना. काही पाहुणे अचानक येण्याची शक्यता आहे. ऑफिसमधलं काम खूपच हेक्टिक होऊ शकेल. व्यायामासाठी नक्की वेळ काढा.

पशुपालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यानंतर 'या' जिल्ह्यात 109 जनावरांना लंपी आजाराची लागण

सिंह (Leo)

तुमच्या जवळची एखादी व्यक्ती बोलण्यातून तुम्हाला कदाचित दुखावू शकते; पण ते गांभीर्याने घेऊ नका. आर्थिक घडामोडींमुळे तुम्ही भविष्यातल्या गुंतवणुकीबाबत विचार कराल. त्वचेबाबतच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज भासू शकेल.

कन्या (Virgo)

तुमच्या नव्या भूमिकेबाबतची चिन्हं तुम्हाला आता दिसू लागतील. एखाद्या मित्राकडून काही देणं यायचं असल्यास ते देण्याबाबत तो आता विचार करण्याची शक्यता आहे. एखादा सुखद धक्का देणारी सहल घडू शकते.

तूळ (Libra)

तुमच्या डोक्यात सध्या विचारांचा गोंधळ आहे; पण नेमकं काहीच कळत नाहीये. त्यामुळे गोष्टी सावकाशीने घ्या. आज तुमच्यातला उदारपणा जागृत होऊ शकतो. स्वतःवर, कुटुंबावर किंवा घरावर खर्च कराल. एखाद्या नवीन कल्पनेने तुमचा दिवस छान जाऊ शकतो.

वृश्चिक (Scorpio)

एखादी हुकलेली संधी पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे आता काम सांभाळण्यासाठी नवीन रिसोर्सेस आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मानसिक त्रासावर चांगला उपाय मिळू शकतो. एखादी महत्त्वाची भेट यशस्वी ठरेल.

ठरलं! पीएम किसान योजनेचा हप्ता 'या' तारखेला खात्यात जमा होणार

धनू (Sagittarius)

फसव्या व्यक्तींपासून दूर राहिलेलंच बरं राहील. कारण त्या तुमच्या मागे चर्चा करू शकतात. तुमच्या पूर्वीच्या कामासाठी तुमचं मॅनेजमेंटकडून (manager) कौतुक होऊ शकतं.

मकर (Capricorn)

स्वतःला दिलेल्या कामाच्या नव्या यादीमुळे तुम्ही व्यग्र राहण्याची शक्यता आहे. तुमच्या खरेपणामुळे एखाद्याचं लक्ष वेधण्याची शक्यता आहे. भूतकाळातला एखादा प्रशंसक तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्यांना उत्तर द्यायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकता.

कुंभ (Aquarius)

तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत मन बनवलं असेल, तर तुम्हाला यश मिळण्याची चिन्हं आहेत. तुम्ही तुमच्या योजनेत पुढे जाऊ शकता. टप्प्याटप्प्याने, हळूहळू होणारी प्रगतीसुद्धा प्रगतीच असते. एखाद्या हरवलेल्या वस्तूबाबत मिळालेल्या बातमीने तुम्हाला आशादायी वाटू शकेल.

मीन (Pisces)

तुमच्या मताविरुद्ध / विचाराविरुद्ध असं काही तरी आज तुम्हाला करावं लागू शकतं. एखादा सहकारी चांगली साथ देऊ शकेल. आरोग्याबाबत नवीन रूटीनचा विचार करत असल्यास हीच योग्य वेळ आहे. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या.

महत्वाच्या बातम्या 
Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची उद्यापासून विक्री सुरू; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये
पोस्ट ऑफिसची अफलातून योजना; 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतोय 35 लाख रुपयांचा नफा
Gauri Pooja 2022: शुभ मुहूर्तावर करा लाडक्या गौरीची पूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी

English Summary: Horoscope Today received month Published on: 01 September 2022, 05:28 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters