1. सरकारी योजना

पीकविमा योजनेअंतर्गत 'माझी पॉलिसी माझ्या हातात' उपक्रम सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होणार आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. आता केंद्र सरकारने (central government) शेतकऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.

या उपक्रमाचे नाव आहे 'माझी पॉलिसी माझ्या हातात' (My policy in my hands). महाराष्ट्रात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. खरीप हंगाम २०२२ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी विमा 'पॉलिसी' घेतली आहे, त्या शेतकऱ्यांना विम्याची पावती घरपोहोच देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अरे व्वा! आता फक्त 40 हजारांत खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या वैशिष्ट्ये

केंद्र सरकारने दिल्या 'या' सूचना

केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार "जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, खासदार, आमदार किंवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना 'माझी पॉलिसी माझ्या हातात' (My policy in my hands) या उपक्रमांतर्गत विम्याची पावती देऊन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात यावा. तसेच विम्याची पावती देण्याचे नियोजन दिवसनिहाय करावे".

"यामध्ये लोकप्रतिनिधी, विमा कंपन्या, बँका, विकास सोसायटय़ा, शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Producer Companies) यांच्या सहभागाने पीकविमा शाळांचे आयोजन करण्यात यावे. या उपक्रमाची जाहिरात राज्य सरकारने सर्व माध्यमांद्वारे करावी. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आपण कोणत्या पिकाचा, किती क्षेत्राचा विमा काढला आहे, त्यात आपला हप्ता किती, राज्य-केंद्राचा हप्ता किती याची माहिती उपलब्ध करून दिली जावी". अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

देशातील प्रथम शेती अवजाराचे ग्रीन सिस्टिम शोरूम बार्शीत सुरू, शेतकऱ्यांना होणार फायदा

'माझी पॉलिसी माझ्या हातात' हा उपक्रम राज्यात आजपासून गावोगावी राबविण्यात येत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार अमरावती येथे या उपक्रमात सहभागी होणार आहेत. विमा शाळांचे आयोजन (Organization of insurance schools) करून शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी, शंकांचे निरसन याठिकाणी करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; गॅस सिलिंडर झाला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त
एकाच दिवशी वाढलेल्या संपत्तीमुळे अदानी वरच्या क्रमांकावर गेले, आकडा वाचून डोळे होतील पांढरे
सरकार शेतकऱ्यांना देतंय वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन; तुम्ही सुद्धा 'या' योजनेचे होऊ शकता लाभार्थी

English Summary: initiative launched crop insurance scheme Farmers benefit Published on: 01 September 2022, 10:22 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters