1. ऑटोमोबाईल

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची उद्यापासून विक्री सुरू; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना नाकी नऊ आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर कमी केले नाहीत.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Ola S1 Electric Scooter

Ola S1 Electric Scooter

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना नाकी नऊ आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर कमी केले नाहीत.

अशा परिस्थितीमध्ये सर्व सामान्यांचा कल इलेक्ट्रिक स्कूटरकडे (Electric scooter) वळत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे, अशा ग्राहकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर ओला कंपनी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर विकण्यास सुरुवात करणार आहे.

कंपनी 2 सप्टेंबरपासून प्रत्येकासाठी ओला एस 1 (Ola S1) ची परचेस विंडो उघडणार आहे. ओलाने 15 ऑगस्ट रोजी लेटेस्ट Ola S1 लाँच केली होती त्याची एक्सशोरूम किंमत 99,000 रुपये इतकी आहे.

भारतातील ग्राहक उद्यापासून त्याच किमतीत Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरचा, (Electric Scooter) मर्यादित स्टॉक खरेदी करू शकतात. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Pro सारख्याच प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आली आहे. Ola S1 ची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

सरकारच्या 'या' योजनेत दररोज जमा करा फक्त 233 रुपये; 17 लाख रुपयांचा मिळणार लाभ

Ola S1 पॉवर आणि रेंज

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kWh इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. या पॉवरमुळे, Ola S1 पूर्ण चार्ज केल्यावर 141 किमी अंतर कापू शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेक राइडिंग मोडमध्ये (Riding mode) येते.

यामध्ये ग्राहकांना इको मोड मिळेल, जो 128 किमीची रेंज देईल, तर नॉर्मल मोड 101 किमीची रेंज देईल. Ola S1 चा स्पोर्ट्स मोड 90 किमीची रेंज देतो. Ola S1 चा टॉप स्पीड 95 kmph असल्याचा कंपनीने दावा केला आहे.

पशुपालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यानंतर 'या' जिल्ह्यात 109 जनावरांना लंपी आजाराची लागण

डिझाइन आणि फीचर्स

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची डिझाईन Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर सारखीच आहे. यात एलईडी डीआरएल, संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (Digital instrument cluster) आणि एलईडी टेललाइटसह एलईडी हेडलॅम्प (LED headlamp)मिळतात. या इलेक्ट्रिक स्कूटर ला एका चार्जवर 500 किमीची रेंजअसेल.

महत्वाच्या बातम्या 
पोस्ट ऑफिसची अफलातून योजना; 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतोय 35 लाख रुपयांचा नफा
Gauri Pooja 2022: शुभ मुहूर्तावर करा लाडक्या गौरीची पूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी
ठरलं! पीएम किसान योजनेचा हप्ता 'या' तारखेला खात्यात जमा होणार

English Summary: Ola S1 Electric Scooter Goes Tomorrow Available price Published on: 01 September 2022, 04:54 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters