1. इतर बातम्या

एकाच दिवशी वाढलेल्या संपत्तीमुळे अदानी वरच्या क्रमांकावर गेले, आकडा वाचून डोळे होतील पांढरे

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील तिसरा श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आता जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांच्या पुढे आहेत. ही कामगिरी करणारे अदानी हा आशिया खंडातील पहिलाच व्यक्ती आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील तिसरा श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आता जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांच्या पुढे आहेत. ही कामगिरी करणारे अदानी हा आशिया खंडातील पहिलाच व्यक्ती आहे.

आता त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांची कंपनी अदानी ट्रान्समिशन (Company Adani Transmission) टॉप 10 कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत गौतम अदानी यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.

हे वर्ष उद्योगपती गौतम अदानींसाठी सर्वोत्तम राहिलं. 2022 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 66.2 दशलक्ष डॉलरने वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलिनियर्स निर्देशांकानुसार (Billionaires Index) अदानी यांच्या एकूण संपत्तीत 31 ऑक्टोबर रोजी बाजार बंद झाल्यानंतर संपत्तीत 5.29 दशलक्ष डॉलर वाढ झाली.

एलआयसीची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; फक्त 29 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतात 4 लाख रुपये

त्यांची संपत्ती 143 दशलक्ष डॉलरवर पोहचली. दुसऱ्या स्थानी असलेले बेंजोस (benzos) यांची एकूण संपत्ती 152 दशलक्ष डॉलर आहे. बेंजोस यांच्या एकूण संपत्तीत 1 दशलक्ष डॉलरची घसरण झाली आहे. या हिशोबानुसार, दोघांमधील अंतर आता केवळ 9 दशलक्ष डॉलरचं राहिलं आहे.

शेतकरी मित्रांनो आता घराच्या छतावरच तयार करा वीज; सरकार देतंय 50 हजारांपर्यंत अनुदान

त्यांच्या संपत्तीत एकाच दिवशी 42 हजार कोटींची वाढ झाली आहे. यामुळे ते मोठ्या क्रमांकावर गेले. अदानी यांनी काही वर्षांमध्येच ही कामगिरी (Performance) केली आहे. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी गुंतवणूक केली आहे.

महत्वाच्या बातम्या;
सरकार शेतकऱ्यांना देतंय वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन; तुम्ही सुद्धा 'या' योजनेचे होऊ शकता लाभार्थी
देशातील प्रथम शेती अवजाराचे ग्रीन सिस्टिम शोरूम बार्शीत सुरू, शेतकऱ्यांना होणार फायदा
अरे व्वा! आता फक्त 40 हजारांत खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या वैशिष्ट्ये

English Summary: Adani top single wealth numbers Published on: 31 August 2022, 05:01 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters