1. इतर बातम्या

हा आहे १० ते ११ जून पर्यंत हवामान अंदाज, आणि कृषी सल्ला

भारतीय हवामान विभाग,अमरावती जिल्ह्यामध्ये प्रादेशिक हवामान केंद्र,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हा आहे १० ते ११ जून पर्यंत हवामान अंदाज, आणि कृषी सल्ला

हा आहे १० ते ११ जून पर्यंत हवामान अंदाज, आणि कृषी सल्ला

भारतीय हवामान विभाग,अमरावती जिल्ह्यामध्ये प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ४० ते ५३ टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता २५ ते ३१ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग सरासरी ताशी ५ ते ६ कि.मी तास राहील.दिनाक ७ जून ते ९ जून २०२२, दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ तसेच हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दिनांक १० जून आणि ११ जून २०२२, ला एक ते दोन ठिकाणी (तुरळक ठिकाणी) विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आकाश ढगाळ राहील.कृषी हवामान सल्ला-  वरील हवामान अंदाज लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. समाधानकारक पाऊस सलग तीन दिवस (८० - १०० मि मी पेक्षा जास्त ) , मातीतील ( ओलावा अडीच ते तीन फूट पर्यंत )या बाबी पेरणीसाठी निर्णायक आहेत, म्हणून पेरणी करताना या दोन्ही बाबींची खात्री करून पेरणीचा निर्णय घ्यावा. सध्याच्या परिस्थिती नुसार १८ जुन पर्यंत शेतकरी बांधवांनी

पेरणी करू नये कारण कि पेरणी योग्य पावसाची शक्यता कमी आहे. शेतकरी बांधवाना विनंती करतोत कि अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये. तसेच अधिकृत माहिती आपणास वेळोवेळी कळवण्यात येईल.पेरणीसाठी वाणांची निवड करताना जमिनीचा प्रकार,पाण्याची उपलब्धता, स्थानिक हवामान, वाणांची वैशिष्ट्ये व बाजारपेठेतील उपलब्धता इ. बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नागरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. 

कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते.कृषी विज्ञान केंद्र ,दुर्गापूर (बडनेरा ) अमरावती येथे शेतकरी बांधवाकरिता उपलब्ध सुविधा, हवामान विषयक माहिती करिता जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि माती व पाणी परीक्षण ,जैविक औषधी व खते, अन्न परीक्षण प्रयोगशाळा,अन्न प्रक्रिया माहिती, रोपवाटिका, बियाणे चाचणी ( उगवण शक्ती ) प्रमाणित व पायाभूत बियाणे उपलब्धता. 

 

शेतकरी मार्गदर्शन केंद्र . संपर्क :- ०७२१-२९९२२४४ , ९६३७७१७८१८, ८३०८०१००३८, ९९२१३३३६११, ७६२०८७७२३७

English Summary: Here is the weather forecast for June 10-11, and agricultural advice Published on: 07 June 2022, 08:12 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters