नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पीएफ असतो. त्यांच्या पगारातून काही भाग कापला जातो. मात्र याचा मोठा फायदा तुम्हाला माहीत असणे गरजेचे असते. या पीएफच्या पैशातून विम्याची सुविधाही उपलब्ध आहे. याचा लाभ कसा घेता येईल आणि या विम्याचे पैसे कोण घेण्यास पात्र आहेत याविषयी माहिती पाहूया...
विमा पॉलिसीची सुविधा EPFO द्वारे चालवली जाते. याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही EPFO चे सदस्य असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे कुठेही जाण्याची गरज नाही. ही सुविधा कंपनीने किंवा संस्थेनेच दिली आहे. याचा फायदा खाजगी आणि सरकारी कर्मचारी दोघेही घेऊ शकतात.
सांगलीकरांसाठी महत्वाची बातमी; जिल्ह्यात 1 हजार 557 कोटींचे कर्ज वाटप
पात्रता काय आहे?
EPFO चा सदस्य असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला EPFO द्वारे विमा संरक्षणाचा लाभ दिला जातो. आजारपणामुळे किंवा अपघातामुळे EPFO सदस्याचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षणाचा लाभ मिळतो.
यासाठी EPFO सदस्याने सलग 12 महिने सेवा कालावधीत असणे आवश्यक आहे. तुम्ही त्याच ठिकाणी काम केले असेलच असे नाही. या विम्याचा लाभ अशा लोकांनाही मिळेल ज्यांनी एका वर्षात एकापेक्षा जास्त ठिकाणी काम केले आहे. या कव्हरचा लाभ घेण्यासाठी नवीन कार्यालयाच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्याशी संबंधित माहिती ईपीएफओच्या कागदपत्रांमध्ये असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! कापूस उत्पादकांसाठी सेंद्रिय कापूस प्रकल्प सुरू
7 लाखांपर्यंतच्या विम्याचा लाभ घेण्यासाठी ई-नॉमिनेशनची सुविधाही सुरु करण्यात आली आहे. म्हणजेच, तुम्ही ऑनलाइन जाऊन तुमचा नॉमिनी बनवू शकता. तुम्ही आधीच तयार केलेल्या नॉमिनीची माहिती देखील अपडेट करु शकता. महत्वाचे म्हणजे विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रीमियम म्हणून वेगळे पैसे भरावे लागणार नाहीत. या योजनेत तुम्ही काम करत असलेल्या संस्थेकडून रक्कम अदा केली जाते.
महत्वाच्या बातम्या
पावसामुळे कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई; 'या' टोल फ्री नंबरवर करा कॉल
आज जागतिक मानसिक आरोग्य दिन; जाणून घ्या महत्वाच्या 'या' 6 गोष्टी
जिल्ह्यात 'गाव तिथं डेअरी', सहकारी दूध संघाचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना होणार फायदा
Share your comments