1. आरोग्य सल्ला

World Mental Health Day: आज जागतिक मानसिक आरोग्य दिन; जाणून घ्या महत्वाच्या 'या' 6 गोष्टी

दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा महत्वाचा उद्देश म्हणजे मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
World Mental Health Day

World Mental Health Day

दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर (october) रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा महत्वाचा उद्देश म्हणजे मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे.

विशेष म्हणजे तणावमुक्त जीवन (A stress free life) देऊन चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे आणि चिंतेने आपले जीवन जगत आहे. माणसाने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मानसिक आजार टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या तणावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ताणामुळे चिडचिड, जास्त राग, झोप न लागणे, एकटे राहणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. याविषयी जाणून घेऊया.

सर्वसामान्यांना मोठा फटका! दिवाळीच्या तोंडावर डाळीं आणि खाद्यतेलाच्या किमतीत वाढ

1) एकटे राहू नका

आपण पाहिले तर ज्या व्यक्ती तणावाखाली असतात, ते एकटे राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना इतर लोकांशी त्यांचा संबंध फारच कमी असतो. म्हणूनच तुम्ही इतर लोकांशी संपर्क साधणे आणि त्यांच्याशी तुमच्या मनाबद्दल बोलणे खूप महत्त्वाचे आहे.

2) नकारात्मक लोकांपासून दूर राहा

सर्वात महत्वाचे म्हणजे जे लोक तुम्हाला नकारात्मक बनवतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. जर तुम्हाला त्यांचे ऐकून तणाव वाटत असेल तर त्यांच्यापासून दूर रहा. सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा.

3) चांगले मित्र बनवा

चांगले मित्र बनवा ज्यांच्याशी तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करू शकाल आणि तुम्हाला आराम वाटेल. असे मित्र ठेवा जे तुम्हाला तुमच्या बोलण्यावरून जज करत नाही बलकी तुम्हाला समजून घेतात आणि तुमची मदत करतात, कारण चांगले मित्र तुम्हाला आवश्यक सहानुभूती देतात तसेच नैराश्याच्या वेळी योग्य वैयक्तिक सल्ला देतात.

LIC जीवन उमंग पॉलिसी: दररोज फक्त 45 रुपये गुंतवा आणि मिळवा 36 हजार रुपयांचा लाभ

4) योग आणि ध्यान

योग आणि ध्यानाला तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा. ध्यान केल्याने तुम्ही स्वतःला तणावमुक्त अनुभवाल, त्यामुळे ध्यान आणि योगासने नियमित करा. हे तुम्हाला तणावापासून मुक्त होण्यास आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करेल.

5) संतुलित आहार

संतुलित आहारामुळे केवळ शरीरच चांगले नाही तर दुःखी मन देखील चांगले बनते. त्यामुळे फळे, भाज्या, मांस, शेंगा, कार्बोहायड्रेट इत्यादींचा संतुलित आहार घेतल्याने मन प्रसन्न राहते. म्हणूनच त्यांचे अधिक सेवन करा.

6) मनाला आनंद देणार्‍या गोष्टी करा

तुम्हाला तुमच्यासाठी थोडा वेळ काढता येईल अशा गोष्टी करा ज्यामुळे मन प्रसन्न (happy mind) होते. जर तुम्हाला मित्रांशी बोलायला आवडत असेल तर मित्रांशी बोला. जर नाचण्याने तुमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर डान्स करा. तुम्हाला आनंद देणार्‍या सर्व गोष्टी करा. याने आरोग्य चांगले राहील.

महत्वाच्या बातम्या 
जिल्ह्यात 'गाव तिथं डेअरी', सहकारी दूध संघाचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना होणार फायदा
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! कापूस उत्पादकांसाठी सेंद्रिय कापूस प्रकल्प सुरू
सांगलीकरांसाठी महत्वाची बातमी; जिल्ह्यात 1 हजार 557 कोटींचे कर्ज वाटप

English Summary: World Mental Health Day 6 important things Published on: 10 October 2022, 02:15 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters