1. पशुधन

जिल्ह्यात 'गाव तिथं डेअरी', सहकारी दूध संघाचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना होणार फायदा

दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने दूध उत्पादकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात गाव तिथं डेयरी संकल्पना राबविण्यात येणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Farmers benefit

Farmers benefit

दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (Cooperative Milk Union) दूध उत्पादकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात गाव तिथं डेयरी संकल्पना राबविण्यात येणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

या संकल्पनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांचा (farmers) व्हावा यासाठी प्रत्येक गावात डेअरी काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे (Ranjit Shinde) यांनी दिली. सध्या गावोगावी डेअरी काढायला सुरुवात झाली असल्याचीही माहिती शिंदे यांनी दिली आहे.

सावधान! तुमच्या 'या' एका सवयीमुळे जीवाला होऊ शकतो धोखा; वेळीच घ्या काळजी

रणजित शिंदे नेमकं काय म्हणाले?

"सोलापूर जिल्ह्यात एक हजार गावं आहेत. या एक हजार गावापैकी फक्त 100 ते 150 गावातूनच जिल्हा दूध संघात दूध येत आहे. त्यामुळं संकलन खूपच कमी होत आहे. त्यामुळं जिल्हा दूध संघात संकलन वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळं आम्ही प्रत्येक गावात डेअरी (Dairy) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा दूध संघाच्या डेअरीला दूध घालावं, कारण जो नफा दूध संघाला होईल तो नफा शेतकऱ्यांना देखील देण्यात येणार असल्याचे रणजित शिंदे यावेळी म्हणाले."

12 वर्षानंतर वृषभ, मिथुन, कर्क राशीच्या लोकांना धनलाभाचा योग; राशीभविष्य काय सांगतंय? जाणून घ्या

17 हजारावरुन 40 हजार लिटर दुधाचं संकलन

दूध संकलन नेमकं का होत नाही, दूध संघाची अशी अवस्था का झाली याबाबत देखील शिंदे यांना विचारण्यात आले. त्यांनी नुकताच माझ्याकडं जिल्हा दूध (District milk) संघाचा कारभार आला आहे. शेतकऱ्यांना कदाचित वेळेवर पेमंट मिळत नसेल त्यामुळं अशी स्थिती निर्माण झाली असेल असे रणजित शिंदे म्हणाले.

परंतु आता आम्ही वेळेवर शेतकऱ्यांना दुधाची पगार देत आहोत. मी दूध संघाचा चेअरन होण्याआधी दुधाचं संकलन हे 17 हजार लिटरवर आलं होतं. मात्र, मी चेअरमन झाल्यापासून दुधाचं संकलन वाढलं आहे. सध्या 40 हजार लिटर दुधाचे संकलन होत असल्याचे रणजित शिंदेंनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! कापूस उत्पादकांसाठी सेंद्रिय कापूस प्रकल्प सुरू
सांगलीकरांसाठी महत्वाची बातमी; जिल्ह्यात 1 हजार 557 कोटींचे कर्ज वाटप
सर्वसामान्यांना मोठा फटका! दिवाळीच्या तोंडावर डाळीं आणि खाद्यतेलाच्या किमतीत वाढ

English Summary: Gaon Tith Dairy district decision cooperative milk union Farmers benefit Published on: 10 October 2022, 01:03 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters